ETV Bharat / state

Gram Panchayat Result: बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटाचा बोलबाला, तर माहविकास आघाडी दोन नंबरवर - बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटाचा विजय

बुलढाणा जिल्ह्यातील 279 ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या असून आज निकाल हाती आले. त्यामधे शिंदे गटाचा बोलबाला पाहायला मिळाला असून महाविकास आघाडी दोन नंबरला तर भाजप तीन नंबरवर राहिला आहे. (Gram Panchayat Result) सर्वत्र जल्लोषाचा वातरण पाहायला मिळत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटाचा बोलबाला
बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटाचा बोलबाला
author img

By

Published : Dec 20, 2022, 9:46 PM IST

बुलढाणा - बुलढाणा जिल्हाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावरही प्रतिष्ठा राखली आहे , त्यांच्या होम ग्राउंड म्हणजे मेहकर व लोणार तालुक्यात शिंदे गटाला घवघवीत यश प्राप्त झाल असून, जिल्ह्यात शिंदे गटाला 68 ग्रामपंचायती मिळविण्यात यश आले आहे. (Gram Panchayat Result) दुसरीकडे, जिल्ह्यातील चिखली येथील विद्यमान भाजप आमदार श्वेता महाले यांना उदयनगर येथील ग्रामपंचायतीचा आपला गड राखता आला नाही. उदयनगर येथून त्या जिल्हा परिषद सदस्या राहिलेले होत्या, आणि याच ठिकाणावरून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आहे.

याठिकाणी आता काँग्रेसचे मनोज लाहुडकर हे सरपंच म्हणून निवडून आले आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी ही आपल्या सिंदखेड राजा मतदार संघात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीसह इतर पक्षाला मतदारांनी जवळपास सारखेच मतदान केले आहे. इतकेच नाही तर विविध राजकीय नेत्यांनी मात्र आमच्याच ग्रामपंचायती ह्या सर्वात जास्त निवडून आल्याचा दावा केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.