बुलढाणा : काल उद्धव ठाकरेंची बुलढाण्यातील चिखली येथे जाहिर सभा झाली. यावेळी त्यांनी शेतकरी मेळाव्याला संबोधित केले. उद्धव ठाकरे यांच्या सभेवर शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी सडकुन टिका केली आहे. कालचा शेतकरी मेळावा होता की आरोप प्रत्यारोप सभा होती ? शेतकऱ्यांविषयी एकही नेता बोलला नाही, असा सवाल गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत बोकडं -गायकवाड संजय राऊत या बोकडाबद्दल आम्ही काही बोलावं असे काही राहिले नाही. भाजप शिवसेना युतीमध्ये आम्ही लढू, त्यांनी काळजी करायची गरज नाही. मातोश्री वर किती खोके गेले याचा हिशेब आम्ही द्यायचा का? आम्ही गद्दार नाही तर उठाव केला. ठाकरेंना मुख्यमंत्री करताना तुम्ही आम्हाला किती खोके दिले ? असा सवाल गायकवाडांनी राऊतांना विचारला.
पुढचं सरकार आमचं- गायकवाड आमचे चाळीस रेडे नाहीत तर चाळीस वाघ कामाख्या देवीला गेले. जिजाऊनी हिंदू स्वराज्य स्थापनेची प्रेरणा शिवरायांना दिली. त्यांचा विचार घेऊन बाळासाहेब पुढे चालले होते. उद्धव ठाकरेंसह इतर लोकांनी निजामाचे विचार असलेल्या पक्षांशी हात मिळवणी केली. त्यांनीच विचार मातीत घातला. त्यांना आम्हाला गद्दार म्हणायचं आधिकर नाही.