बुलडाणा - सोमवारपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर मंगळवारपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. शासनाने घालून दिलेल्या शिस्तीचे पालन व्हावे यासाठी मंदिर प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत.
दर्शनासाठी भक्तांच्या रांगा
आठ महिन्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु करण्याचे आदेश दिले होते, मात्र जो पर्यंत बुलडाणा जिल्हाधिकारी यांचे सुधारित आदेश मिळत नाही तो पर्यत मंदिर उघडण्यात येणार नाही अशी भूमिका ट्रस्टने घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढल्यानंतर व भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गजानन महाराज मंदिर मंगळवारी पहाटे 5 वाजेपासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. यामुळे आज (मंगळवारी) पहिल्याच दिवशी मंदिरात भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.
ई-पासची सुविधा
मंदिर परिसरात एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून 6 फुटाचे अंतर ठेवण्यात आले आहे. तोंडावर मास्क आवश्यक आहे. मंदिर परिसर सॅनिटाईज करण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यासाठी मंदिर प्रशासनाने विविध उपाय योजना केल्या आहेत. त्यात दर्शसनासाठी ई-पास लागणार असून http://gajananmaharaj.org:8080/ या संकेत स्थळावरून ई-पास काढावे लागणार आहे. सोबत आधार कार्ड ही लागणार आहेत. आज साधारण 10 हजार भाविक दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - नाराज सदाभाऊंची मनधरणी करण्यात भाजपाला यश; पुणे पदवीधर निवडणूकीतून रयतचा उमेदवार मागे
हेही वाचा - बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतिदिन; मुख्यमंत्री सहकुटुंब वाहणार आदरांजली