बुलडाणा - शेगाव येथील भाग्यश्री पॅलेस गेस्ट हाऊसमध्ये सर्रास चालणाऱ्या सेक्स रॅकेटवर खामगाव येथील एसडीओपी पथकाने शुक्रवारी १ मार्चच्या रात्री छापा टाकला. यामध्ये २ मुलींसह एका आंबट शौकीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.
छापा पडताच आणखी काही आंबट शौकीन पळून जाण्यात यशस्वी झालेत. शेगाव येथील भाग्यश्री पॅलेस गेस्ट हाउसमध्ये महिला व मुलींना आणून त्यांच्याकडून सेक्स व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती खामगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकला मिळाली. त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठविण्यात आले.
या ग्राहकाने इशारा करताच शुक्रवारी सायंकाळी या गेस्ट हाउसवर छापा टाकण्यात आला. यात नागपूर आणि अमरावती येथील दोन युवतींना ग्राहकांजवळ पाठविल्या जात असल्याचे निदर्शनास आल्यावरुन गेस्ट हाउस व्यवस्थापक हुसैन खान अजगर खान आणि १ आंबट शौकीन मुलांसोबत दोन्ही युवतींना ताब्यात घेण्यात आले. सर्वांना पोलीस स्टेशन मध्ये आणून गेस्ट हाऊस व्यवस्थापक आणि एका आंबट शौकीन विरोधात कलम ३,४,५,७ सह अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून मुलींना सोडण्यात आले आहे