बुलडाणा - नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी सर्वच्या सर्व 6 सभापतींची बिनविरोध निवड झाली आहे. बुधवारी 5 फेब्रुवारीला सभापतिपदासाठी निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी 31 डिसेंबरला स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीच्या वेळेपर्यंत सभापतिपदासाठी एकही गट स्थापन झाला नसल्यामुळे तसेच एकही उमेदवारी अर्ज दाखल न आल्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात आली होती.
हेही वाचा - प्रेयसीच्या घरात सापडल्याने प्रियकराला बेदम मारहाण; तरुणाचा मृत्यू
बुलडाणा नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत बुधवारी 5 फेब्रुवारीला सभापतिपदाच्या 6 पदांसाठी निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक सभापतिपदासाठी एकच अर्ज आल्याने सहाच्या 6 सभापती बिनविरोध विजयी झाले. यात महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी सुनिता विजय गवई, आरोग्य व स्वच्छता विषय समिती आशिष श्रीराम जाधव, शिक्षण समिती राणी बी शेख लाल, सार्वजनिक बांधकाम समिती सय्यद आसीफ सय्यद यासीन, पाणीपुरवठा पुष्पा शिवाजी धूड, नियोजन व विकास समिती सभापतिपदी विजय मधुकर जायभाय यांची बिनविरोध निवड झाली आहे.
स्थायी समितीच्या सदस्यपदी रजीयाबी शेख रहीम, दिपक दशरथ सोनवणे, कैलास गणेश माळी या 3 सदस्यांची निवडही याचवेळी करण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे तर सहाय्यक म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे होते.
हेही वाचा - कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ७१ शिक्षक बीएलओंवर गुन्हे दाखल; राज्यातील सर्वात मोठी कारवाई