बुलडाणा - समृद्धी महामार्गावरील निर्माणाधीन पुलाचा ( Samruddhi Highway bridge part collapsed in Buldana ) भाग कोसळल्याची घटना सिंदखेड राजा तालुक्यातील ( Samruddhi Highway news buldana ) पिंपळखुटा या परिसरात घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. या अगोदर देखील रस्ते कामात मोठी दुर्घटना घडली होती. आता या घटनेनंतर समृद्धी महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हेही वाचा - Family Planning Kit : ही आपली भारतीय संस्कृती नाही, सरकारने 'ती' रबरी वस्तू काढून टाकावी - तबसुम हुसैन
पुलाचा भाग कोसळला ( Samruddhi Highway bridge news ) व तो पुलाखाली असलेल्या मोठ्या ट्रेलरवर पडला. यात ट्रेलर पूर्णपणे तुटला. हा पूल कोसळताना तिथे कुणीही नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यापूर्वी देखील महामार्गावर मोठी दुर्घटना घडली होती. मार्गावरील कमान पडली होती. समृद्धी महामार्गाचे एवढे भव्यदिव्य काम सुरू असताना अशा प्रकारच्या घटना घडणे अत्यंत चुकीचे असून, महामार्गाच्या कंत्राटदारांनी अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच, राज्य शासनाने देखील या महामार्गावरील पुलाचे व इतर रस्त्याचे चांगल्या प्रकारे ऑडिट करून नंतरच पूल सुरू करावे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.
कामे प्रलंबित असल्याने उद्घाटन पुढे ढकलले - नागपूर ते मुंबईला जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या २१० किलोमीटर कामाचा शुभारंभ २ मेला होणार होता. मात्र महामार्गावरील अनेक ठिकाणची कामे प्रलंबित आहेत. तर काही कामे धिम्यागतीने सुरू आहेत. कामे प्रलंबित असल्याने समृद्धी महामार्गाचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
पुलाचे बांधकाम अद्याप सुरू, विद्युत दिवेही नाहीत - राज्याच्या आर्थिक राजधानीला उपराजधानीने जोडण्यासाठी मुंबई ते नागपूर हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. मार्गावरील शेलू ते नागपूरमधील शिवमडका हे २१० किलोमीटरचा भाग लवकरच सर्वांसाठी खुला होणार आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकार आणि एमएसआरडीसीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या महामार्गावरील अनेक कामे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागपूरकडील टोल नाक्यापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर पुलाच्या बांधणीचे काम सुरू आहे. दोन्ही बाजूला खोदकाम केले जात आहे. तर २१० किलोमीटर मार्गावरील काही भागात रस्त्यावर रेलिंग, विद्युत दिवे बसवलेले नाहीत. काही भागात हे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हेही वाचा - नवरदेव नाचण्यात मग्न; उशीर झाल्याने वधूपित्याने नवरीचे लग्न लावले दुसऱ्याच वरासोबत