ETV Bharat / state

'सबका साथ, सबका विकास' हाच माझा ध्यास - अॅड.आकाश फुंडकर

author img

By

Published : Oct 8, 2019, 2:23 AM IST

भाजप-शिवसेना महायुतीचे खामगाव विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अॅड. आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ सोमवारी खामगाव येथे मुस्लिम समाजाचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला आमदार आकाश फुंडकर यांनी संबोधित केले.

मुस्लिम समाज बांधवांचा विजय संकल्प मेळावा

बुलडाणा - मी कुणालाही तुरूंगामध्ये टाकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावलेली नाही. आपण फक्त विकासावर भर दिला आहे. 'सबका साथ, सबका विकास' हाच माझा ध्यास आहे, असे प्रतिपादन आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी केले. खामगाव येथे झालेल्या मुस्लिम समाज बांधवांच्या विजय संकल्प मेळाव्यात फुंडकर बोलत होते.

अॅड. आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ सोमवारी खामगाव येथे मुस्लिम समाजाचा भव्य मेळावा संपन्न

भाजप-शिवसेना महायुतीचे खामगाव विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अॅड. आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ सोमवारी खामगाव येथे मुस्लिम समाजाचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला आमदार आकाश फुंडकर यांनी संबोधित केले.

खामगाव मतदार संघात मी निवडून येण्याआधी मुस्लीम बहुल भागात विकास कामे झाली नाहीत. त्यामुळे मुस्लीम समाज बांधवांची अवस्था वाईट झाली होती. त्यामुळे 'सबका साथ, सबका विकास' या केंद्र शासनाच्या धोरणानुसार मुस्लीमबहुल वस्त्यांसह संपूर्ण मतदार संघात मुलभूत सुविधांची कामे केली. या विकास कामांमुळे फक्त 5 वर्षात मतदार संघाचा चेहरा-मोहरा बदलू लागला आहे. येणा-या काळात दुप्पट कामे करून मतदार संघ समस्यामुक्त केल्याशिवाय राहणार नाही. आमदार नाही तर कामदार होऊन काम करण्याचा संकल्प आहे, असे अॅड. आकाश फुंडकर यांनी सांगितले.

हेही वाचा- भुसावळ्यात सामूहिक हत्याकांडानंतर तणावपूर्ण शांतता; घटनास्थळी जमावबंदी लागू

यावेळी भाजप सोशल मीडिया सेलचे सागर फुंडकर, मुस्लीम समाजाचे नेते हाजी बुढन खाँ, गनी काजी लाखनवाडा यांच्यासह भाजपा-शिवसेना महायुतीचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

हेही वाचा- जळगाव जिल्ह्यात बंडखोरीमुळे बदलणार राजकीय समीकरणे

भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख, मोहम्मद जमादार, शोहरत खान, अनिस जमादार, गुलजम्मा शाह, गनी काजी लाखनवाडा यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. मुस्लीम समाज बांधव आमदार आकाश फुंडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही दिली. या विजय संकल्प मेळाव्याला सुमारे 5 हजार मुस्लीम समाज बांधवांची उपस्थिती होती.

Intro:Body:बुलडाणा : आपण कुणालाही जेलमध्ये टाकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली नाही, कुणा विरोधकांच्या घरासमोरील रस्ता बंद केला नाही आपण आपण फक्त आणि फक्त विकासावर भर दिला असून सबका साथ, सबका विकास हा माझा ध्यास असल्याचे प्रतिपादन आमदार ऍड आकाश फुंडकर यांनी खामगांव येथे झालेल्या मुस्लिम समाज बांधवांच्या विजय संकल्प मेळाव्यात केले.
भाजपा-शिवसेना महायुतीचे खामगाव विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार ऍड. आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ सोमवारी रात्री खामगाव येथील श्रीहरी लॉन्स येथे मुस्लिम समाजाचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला आमदार आकाश फुंडकर यांनी संबोधीत केले. यावेळी भाजपा सोशल मीडिया सेलचे सागर फुंडकर, मुस्लीम समाजाचे नेते हाजी बुढन खॉ, गनी काजी लाखनवाडा यांचेसह भाजपा-शिवसेना महायुतीचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. आमदार फुंडकर पुढे बोलतांना म्हणाले की, मतदार संघात मी निवडुन येण्याआधी 15 वर्षात विशेषत: मुस्लीम बहुल भागात विकास कामे न झाल्याने मुस्लीम समाज बांधवांची अवस्था वाईट झाली होती. हे सर्व पाहून मला अक्षरश: लाज वाटू लागली. त्यामुळे मी सबका साथ सबका विकास या केंद्र शासनाच्या धोरणानुसार मुस्लीम बहुल वस्त्यांसह संपुर्ण मतदार संघात रस्ते, नाल्या, व महत्वाच्या मुलभूत सुविधांची कामे केल्यामुळे केवळ 5 वर्षात हया मुस्लीम वस्त्यांचा चेहरा मोहरा बदलू लागला आहे. आणि येणा-या काळात हयापेक्षा दुप्पटीने कामे करण्यात येऊन मतदार संघ समस्या मुक्त केल्या शिवाय राहणार नाही. शिवाय आमदार नव्हे तर कामदार बनून काम करण्याचा माझा संकल्प आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख, मो.इद्रीज जमादार, शोहरत खान, अनिस जमादार, गुलजम्मा शाह, गनी काजी लाखनवाडा यांनी सुध्दा आपले विचार व्यक्त केले. उपरोक्त नेत्यांनी आपल्या भाषणांमधून मुस्लीम समाज बांधव आमदार आकाश फुंडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे संचलन सै.नजीब इकबाल तर आभार प्रदर्शन फिरोज खान यांनी केले. यावेळी मेळाव्याला सुमारे 5 हजार मुस्लीम समाज बांधवांची उपस्थिती होती.

बाईट आमदार ऍड आकाश फुंडकर

mh_bul_gathering of the Muslim community_01

Attach Vidio File - 05
Attach Foto File - 02
Attach Audio File - 00
-----------------------------------------------

- फहीम देशमुख, शेगाव
मोबा - 09922014466Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.