ETV Bharat / state

पत्नीचा खून करून फरार झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत - dead body found palaskhed

हिरडव येथे ३ सष्टेबरला दारूड्या विकास शेषराव घायाळ याने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. दरम्यान आज विकासचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पळसखेड शिवारात आढळला.

मृतदेह
मृतदेह
author img

By

Published : Sep 19, 2020, 10:32 PM IST

बुलडाणा- लोणार तालुक्यातील हिरडव येथे पत्नीचा खून करून फरार झालेल्या दारूड्या पतीचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पळसखेड शिवारातील एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता. ही घटना आज उघडकीस आली.

हिरडव येथे ३ सष्टेबरला विकास शेषराव घायाळ याने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. दरम्यान आज विकासचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पळसखेड शिवारात आढळला. मृतदेहातून परिसरात दुर्गधी पसरली होती. परिसरातील शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. ठाणेदार रविंद्र देशमुख यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख, लेखनिक चंद्रशेखर मुरडकर, गोपनीय विभागाचे कैलास चतरकर आदींसह घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. पोलिसांना विकासच्या पाकिटात आधार कार्ड सापडले. त्यावरून मृतदेह त्याच्याच असल्याचे समजले.

दरम्यान, विकासचे मृतदेह हे कुजलेल्या अवस्थेत असल्याकारणाने घटनास्थळीच त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्याची हत्या झाली की आत्महत्या हे स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा- अल्पवयीन मुलीवर चार तरुणांकडून बलात्कार, तिघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.