ETV Bharat / state

पैनगंगेला पूर, बुलडाणा-चिखली-धाड-अजिंठा मार्ग 1 तासापासून बंद - येळगाव धरण

संततधार पावसामुळे बुधवारी संध्याकाळी पैनगंगेला पूर आला असून येळगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे बुलडाणा-चिखली-धाड-अजिंठा हा मार्ग 1 तासापासून बंद आहे. तर, रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे 2 वाहने अडकून पडली होती, त्यात असलेल्या 6 लोकांना महसूल विभागाने सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे.

पुरामुळे बुलडाणा-चिखली मार्ग 1 तासापासून बंद
author img

By

Published : Sep 11, 2019, 11:16 PM IST

बुलडाणा - मागील 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून येळगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तर, बुलडाणा-चिखली मार्ग पाण्यामुळे १ तासापासून बंद असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या 2 वाहनांमध्ये अडकलेल्या 6 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

budana
पुरामुळे बुलडाणा-चिखली मार्ग 1 तासापासून बंद

गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबायचे नाव घेत नाही. संततधार पावसामुळे बुधवारी संध्याकाळी पैनगंगा नदीला पूर आला आहे. यामुळे आगोदरच 100 टक्के भरलेले येळगाव धरण ओवरफ्लो झाले असून बुलडाणा-चिखली मार्ग गेल्या 1 तासापासून बंद आहे. या रस्त्यावरुन वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात 2 वाहन अडकले होते त्यात असलेल्या 6 लोकांना महसूल विभागाने सुखरूप बाहेर काढल्याची माहिती येळगावचे तलाठी झगरे यांनी दिली आहे तर त्यांचे वाहन सद्या पाण्यात अडकलेले आहेत.

हेही वाचा - कर्जासाठी बँकेसमोर शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन; तब्बल ४ महिन्यांपासून शेतकऱ्यांची कुचेष्टा

येळगाव धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाणी खाली असलेल्या पेनटाकळी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. पेनटाकळी धरण 90 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असल्याने त्याचे 7 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर, या धरणातून 5160 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून त्यामुळे नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. पैनगंगेला आलेल्या पुरामुळे बुलडाणा-अजिंठा, बुलडाणा-धाड, बुलडाणा-रायपूर व बुलडाणा-चिखली असे ऐकून 4 मुख्य मार्ग बंद पडले आहेत. तर या संपूर्ण परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष देऊन आहे.

Intro:Body:बुलडाणा:-गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पैनगंगा नदीला पुर आला असून आगोदरच 100 टक्के भरलेला येळगांव धरण ओवरफ्लो झाला असून बुलडाणा-चिखल हा मागील 1 तासा पासून बंद असून या पुराच्या पाण्यात 2 वाहन अडकले होते त्यात असलेले 6 लोकांना महसूल विभागाने सुखरूप बाहेर काढल्याची माहिती येळगांवचे तलाठी झगरे यांनी दिली आहे तर त्यांचे वाहन सद्या पाण्यात अडकलेले आहे.
येळगांवचा पाणी खाली पेनटाकली धरण मध्ये मोठ्या प्रमाणात जात आहे,पेनटाकली धरण 90 टक्के पेक्षा जास्त भरलेला असल्याने त्याचे 7 दरवाजे उघड़ण्यात आले आहे यामधून 5160 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सु करण्यात आलेला आहे, यामुळेच नदी काठच्या गावांना सतरकतेचा इशारा देण्यात आलेला आहे.पैनगंगेला आलेल्या पूरा मुळे बुलडाणा-अजिंठा,बुलडाणा-धाड,बुलडाणा-रायपुर व बुलडाणा-चिखली असे ऐकून 4 मुख्य मार्ग बंद पडलेले आहे.या संपूर्ण परिस्तिथिवर जिल्हा प्रशासन लक्ष देऊन आहे

सूचना:- जे फोटो पाठवत आहे हे ग्राम देऊळघाट येथील पैनगंगेला आलेले पुराचे आहे...

-वसीम शेख,बुलडाणा-
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.