बुलडाणा - न्यायालयाचा अवमान करता येणार नाही म्हणून शिखर बॅंकेतील दोषींवर गुन्हे दाखल केले. यामध्ये भाजपचा काहीही संबंध नाही. मात्र, हे निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी आरोप-प्रत्यारोप करत आहेत, अशी टीका शरद पवारांचे नाव न घेता रावसाहेब दानवे यांनी केली. गुरुवारी २६ सप्टेंबरला ते जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे पेज बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले होते. दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.
हेही वाचा-शरद पवारांना अडचणीत आणणारी ‘ईडी’ नक्की आहे तरी काय?
शिखर बँकेच्या भ्रष्टाचार संदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात शिखर बँक बरखास्त केली गेली. या बँकेवर कलम ११ लावून बॅंकेचे अधिकार कमी करून टाकले. या बॅंकेचे बोर्ड बरखास्त केले ते आत्तापर्यंत बरखास्त आहे. जाधव नावाचा एक माणूस यासंदर्भात न्यायालयात गेला होता. न्यायालयाने ताशेरे ओढले आणि या भ्रष्टचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश दिले. त्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी बोर्ड बरखास्त केले, असे दानवे यांनी सांगितले.