ETV Bharat / state

बच्चू कडूंच्या विधानाला आमचे समर्थन; तर उथळ नेत्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी - राजू शेट्टी - कृषीमंत्री

भाजप जाती धर्मात वाद आणि दंगली घडवते म्हणून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडीला समर्थन दिले आहे. मात्र, त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी दिलेली आश्वासने पाळू नये. आघाडी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाही तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही वेळोवेळी त्यांना आठवण करून देऊ, असा इशारा राजू शेट्टींनी दिला.

बुलडाणा शेतकरी संघटना
राजू शेट्टी
author img

By

Published : Feb 9, 2020, 3:49 AM IST

Updated : Feb 9, 2020, 9:41 AM IST

बुलडाणा - शेतकरी कर्जमाफी संदर्भात मंत्री बच्चू कडू यांच्या विधानाला आपले समर्थन असून बच्चू कडू यांना विरोध करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्यासारख्या उथळ मंत्र्यांवर आता मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुलडाण्यातील पत्रकार परिषदेत केली. स्वाभिमानीच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन आणि पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राजू शेट्टींची अब्दुल सत्तारांवर टीका

दोन लाखांच्या कर्जमाफीबाबत महाविकास आघाडीचे मंत्री बच्चू कडू यांनी या कर्जमाफीचा फायदा बँकांना होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांना आमचे समर्थन आहे. कारण सुरुवातीला पीक कर्ज घेताना योजनेतून 365 दिवसासाठी 6 टक्के व्याजाने कर्ज मिळते. 365 दिवसात कर्ज भरल्या गेले नाही तर पुढच्या वर्षापासून 12 ते 13 टक्के दराने व्याज आकारले जाते. आता 4 वर्षांपासून शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे. यामुळे 2 लाखांच्या कर्ज योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. असे असताना मंत्री अब्दुल सत्तार मात्र बच्चू कडू यांना राजीनामा देण्याची भाषा करत आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यासारख्या उथळ मंत्र्यांवर आता मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी, ही आमची भूमिका असल्याचे यावेळी राजू शेट्टी म्हणाले.

म्हणून आमचे आघाडीला समर्थन-

भाजप जाती धर्मात वाद आणि दंगली घडवते म्हणून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडीला समर्थन दिले आहे. मात्र, त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी दिलेली आश्वासने पाळू नये. आघाडी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाही तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही वेळोवेळी त्यांना आठवण करून देऊ, असा इशारा राजू शेट्टी यांनी आघाडी सरकारला दिला आहे.

Intro:Body:बुलडाणा: - शेतकरी कर्जमाफी च्या संदर्भात मंत्री बचचू कडू यांच्या विधानाला आपले समर्थन असून बच्चू कडू यांना विरोध करणाऱ्या अब्दुल सत्तार सारख्या उथळ मंत्र्यांवर आता मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी असे उदगार स्वाभिमानीचे सर्वासर्वे राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत बुलडाण्यात केले ते जिल्हा कार्यालयाचे उदघाटन व पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले होते..

दोन लाखाच्या कर्ज माफीबाबत महाविकास आघाडीचे मंत्री यांनी या कर्ज माफीचा फायदा बैकेंना होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.त्याचा आमचा समर्थन आहे.कारण सुरुवातील पीक कर्ज घेतांना योजनेतून 365 दिवसासाठी 6 टक्के व्याजाने कर्ज मिळते 365 दिवसात कर्ज भरल्या गेले नाही तर पुढच्या वर्ष्यापासून 12 ते 13 टक्के कर्जाला कर्ज आकारले जाते.आते 4 वर्षपासून शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे.यामुळे 2 लाखाचे कर्ज योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.असे असतांना मंत्री अब्दुल सत्तार बच्चू कडू यांना राजीनामा देण्याची भाषा करत आहे.अश्या अब्दुल सत्तार सारख्या उथळ मंत्र्यांवर आता मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी ही आमची भूमिका असल्याचे यावेळी राजू शेट्टी म्हणाले.तर भाजपवर टीकास्त्र सोडतांना ते म्हणाले भाजप जाती धर्मात वाद निर्माण करतं, दंगली घडवतं म्हणून भाजप ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडीला समर्थन दिलं मात्र त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी दिलेले आश्वासन पाळू नये , आघाडी सरकार ने आश्वासन पाळले नाही तर आम्ही गप्प बसणार नाही , आम्ही वेळोवेळी त्यांना आठवण करवून देऊ अश्या कडक अक्षदा राजू शेट्टी यांनी आघाडी सरकार ला दिल्या आहे,

स्पीच-राजू शेट्टी,स्वाभिमानी शेतकरी संघटना..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Feb 9, 2020, 9:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.