बुलडाणा - सरकारने पास केलेल्या कृषी कायद्याला राज ठाकरे समर्थन करत असल्याच्या प्रश्नावर जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरेंना सद्या प्रसिद्धीची गरज असल्यामुळे ते बिचारे समर्थन करत आहेत. त्यामुळे त्यांना तुम्ही किती महत्व द्यायचे ते तुम्ही ठरवा, असे मंत्री जयंत पाटील म्हणाले.
मंत्री जयंत पाटील हे आज (8 फेब्रुवारी) राष्ट्रवादी कार्यकर्ता परिवार मेळाव्यानिमित्ताने बुलडाण्यात आले होते. त्यांच्यासोबत बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आढावा घेतला.
हेही वाचा - शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक बळकट; अमित शाहांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर
राज ठाकरे काय म्हणाले होते -
आणलेले तीन कृषी कायदे हे चुकीचे नाहीत. मात्र, त्यामध्ये त्रुटी असू शकतात. परंतू, केंद्राने राज्याचा विचार करून त्यांच्यासोबत चर्चा करून या कायद्याची अंमलबजावणी करायला पाहिजे, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते.