शेगाव : भारत जोडाे यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी शेगावात सभा ( Bharat Jode Yatra ) घेतली. नांदेड येथील सभेपेक्षा जास्त गर्दी जमवण्यात काँग्रेस यशस्वी ठरली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेने नाराजी व्यक्त करत आघाडीत फुटीची भाषा केली. राष्ट्रवादीने राहुल गांधींनी असे बोलायला नको होते, असा पवित्रा घेतला. दरम्यान, दिवसभर भाजप आणि मनसेने राहुल यांच्याविरुद्ध आंदोलन केले. शेगावात राहुल गांधी यांनी सावरकरांचा मुद्दा टाळत शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी यावरून केंद्र, राज्य सरकारवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, मागील आठ वर्षांत देशात सामाजिक विषमता वाढीस लागली ( Offensive statement On Veer Savarkar ) आहे.
महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष : शेतकरी प्रचंड संकटात आहे, तरुण वर्ग नोकरीच्या शोधात आहे. पण त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यांच्या समस्या कुणी ऐकत नाही. मुलांच्या शिक्षणावर पालकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. मुले इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतात आणि त्यांना एखादी खासगी टॅक्सी चालवावी लागते किंवा किरकोळ काम करावे लागते. पालकांनी यासाठी एवढा खर्च केला का ? तरुण, शेतकरी उघड्यावर आहेत आणि दुसरीकडे याच हिंदुस्थानात काही मूठभर लोकच श्रीमंत होतात, असा हिंदुस्थान नको आहे आणि आम्ही तो होऊ देणार नाही. असे ते म्हणाले
राहुल गांधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल : सावरकरांबद्दल वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या प्रमुख वंदना सुहास डोंगरे यांनी ठाणे नगर पोलिसांत राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल ( Case Filed Against Rahul Gandhi ) केला. सावरकरांवरून आघाडीत बेबनाव पहायला मिळत ( Mahavikas Aaghadi Various Opinions ) आहे.
संजय राऊत : राहुल गांधी यांनी नवा इतिहास निर्माण करण्याकडे लक्ष द्यावे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत वक्तव्य केल्यास या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत फूट पडू शकते.
छगन भुजबळ : सावरकर यांनी देशासाठी शिक्षा भोगली ती आपल्याला मान्य करायला हवी. राहुल गांधी यांना वक्तव्य टाळता आले असते तर बरे झाले असते, एवढेच मला म्हणायचे आहे.
जयराम रमेश : शिवसेना आणि काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत. त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही पुढेही एकत्रच राहणार आहोत.