ETV Bharat / state

स्टिंग ऑपरेशन : बुलडाण्यात परीक्षेला सुरुवात होऊन अर्धा तास होताच प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर - शिक्षणाधिकारी

बबनराव देशपांडे विद्यालयातून १२ वीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका परिक्षा सुरू होताच व्हॉट्सअॅपवरून बाहेर आल्याची चर्चा होती. त्याप्रकरणी चौकशीमध्ये काहीच हाती न लागल्याचा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी दावा केला. देशपांडे विद्यालय भाजप सत्ताधाऱ्याचे असल्याने शिक्षणाधिकारी या शाळेवर कारवाई करण्यापासून घाबरत असल्याचे बोलले जात आहे.

हिंदी विषयाची फुटलेली प्रश्नपत्रिका
author img

By

Published : Mar 9, 2019, 9:45 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानात सुरू असलेल्या बारावी व दहावीच्या परीक्षेत परीक्षा सुरू होताच चक्क अर्धा तासातच प्रश्न पत्रिकेतील प्रश्न परीक्षा केंद्रातूनच बाहेर येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील मोताळा येथील बबनराव देशपांडे विद्यालयातून गुरुवारी ७ मार्चच्या सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी हिंदी विषयाच्या परिक्षेच्या दिवशी हा प्रकार घडला. यानंतरही जिल्ह्याचे परीक्षा नियंत्रक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. अशा प्रकरणात गुन्हा दाखल होवू शकतो का हे पाहतो? असे उत्तर त्यांनी दिले.

स्टिंग ऑपरेशन

विशेष म्हणजे याच बबनराव देशपांडे विद्यालयातून १२ वीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका परिक्षा सुरू होताच व्हॉट्सअॅपवरून बाहेर आल्याची चर्चा होती. त्याप्रकरणी चौकशीमध्ये काहीच हाती न लागल्याचा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी दावा केला. देशपांडे विद्यालय भाजप सत्ताधाऱ्याचे असल्याने शिक्षणाधिकारी या शाळेवर कारवाई करण्यापासून घाबरत असल्याचे बोलले जात आहे.

सध्या राज्यात १० वी व १२ वीची परीक्षा सुरू असून राज्यासह बुलडाणा जिल्ह्यातही कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. ज्या परीक्षा केंद्रात ८ विद्यार्थी कॉपी करताना आढळतील त्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करणार असल्याचे राज्य शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असतानाही मोताळा येथील बबनराव देशपांडे या विद्यालयात परीक्षा केंद्रातील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी सर्रास सूट देण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तासानंतरच हिंदी प्रश्न पत्रिकेतील प्रश्न कागदावर लिहून परीक्षा केंद्राबाहेर येत असल्याचा व केंद्राबाहेर आलेल्या प्रश्नांची प्रत स्थानिक झेरॉक्स दुकानातून १०-१० रुपयांना विकली जात असल्याचा प्रकार समोर आला. या झेरॉक्सच्या मदतीने केंद्राबाहेर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर कॉपीच्या माध्यमातून देण्यासाठी सोय केल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे.

याबाबत जिल्ह्याचे परीक्षा नियंत्रक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांना हा सर्व प्रकार लक्षात आणून दिल्यावर त्यांनी मोताळा पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी आणि पेपर सुरक्षा निरीक्षक नेटके यांनी बबनराव देशपांडे परीक्षा केंद्रावर परीक्षा दरम्यान भेट देत तपासणी केली. तसेच ही जबाबदारी माझी नसून मी प्रश्नपत्रिका सुरक्षा रक्षक असून यासंदर्भात मी काहीही करू शकत नसल्याचे मत नेटके यांनी व्यक्त केले. यावर शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांची प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी अजबच प्रतिकिया दिली. ते म्हणाले, की पाहतो अशा प्रकरणात गुन्हा दाखल होवू शकतो का? तर भरारी पथकाला याबाबत विचारल्यावर त्यांनी भरारी पथकाच्या कारवाईवर सोडून चक्क विद्यार्थ्यांच्या पालकांनाच कॉपी न करू देण्याचे आवाहन केले.

Intro:बुलडाणा:-बुलडाणा जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानात सुरू असलेल्या बारावी व दहावीच्या परीक्षेत परीक्षा सुरू होताच चक्क अर्धा तासातच प्रश्न पत्रिकेतील प्रश्न परीक्षा केंद्रातूनच बाहेर येत असल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील स्व.बबनराव देशपांडे विद्यालयातून गुरुवारी 7 मार्चच्या सकाळी 11:20 वाजता हिंदीच्या पेपरच्या दिवशी समोर आला आहे. तरीही जिल्हयाचे परीक्षा नियंत्रक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे म्हणतात अश्या प्रकरणात पाहतो गुन्हे दाखल होवू शकतो का? विशेष म्हणजे याच स्व. बबनराव देशपांडे विद्यालयातून बारावीचा इंग्रजीचा प्रश्न पत्रिका पेपर सुरू होताच वाटसप वरून बाहेर आल्याची चर्चा समोर आली होती त्यामध्येही चौकशी मध्ये काहीच हाती न लागल्याचा हवाला देत माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांचे म्हणणे आहे.तर बबनराव देशपांडे विद्यालय हे भाजप सत्ताधाऱ्याची शाळा असल्याकारणाने शिक्षणाधिकारी या शाळेवर कार्रवाई करण्यापासून घाबरत असल्याचे बोलल्या जात आहे..Body:सध्या दहावी व बारावीची परीक्षा राज्यात सुरू असून राज्यासह बुलडाणा जिल्ह्यातही कॉपीमुक्त अभियान राबिविला जात आहे.ज्या परीक्षा केंद्रात 8 विद्यार्थी कॉपी करतांना आढळल्यास त्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करणार असल्याची राज्य शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षण विभागाला बजविण्यात आले आहे.असे असतांना देखील मोताळा येथील स्व.बबनराव देशपांडे या विद्यालयात परीक्षा केंद्रातील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी सर्रास सूट देण्यात येत आहे.एवढेच नव्हे तर हिंदी प्रश्न पत्रिकेतील प्रश्न कागदावर लिहून परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तासानंतरच वेळेनंतरच परीक्षा केंद्राबाहेर येत असल्याचा व केंद्राबाहेर आलेल्या प्रश्नांची प्रत स्थानिक झेरॉक्स दुकानातून 10-10 रुपयात विकला जावून केंद्राबाहेर आलेल्या प्रश्नामूळें विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर कॉपीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना देण्यासाठी सोयीचे होत असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला. याबाबत जिल्हयाचे परीक्षा नियंत्रक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांना हा सर्व प्रकार लक्षात आणून दिल्यावर त्यांनी मोताळा पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी तथा पेपर सुरक्षा निरीक्षक श्रीमती नेटके यांनी स्व. बबनराव देशपांडे परीक्षा केंद्रावर परीक्षा दरम्यान भेट देवून तपासणी केली.व ही जबाबदारी माझी नसून मी पेपर सुरक्षा रक्षक असून यासंदर्भात मी काही करू शकत नाही.तर यावर शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांची प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी अजबच प्रतिकिया दिली ते म्हणतात पाहतो अश्या प्रकरणात गुन्हे दाखल होवू शकतो का? तर भरारी पथकाला बाबत विचारल्यावर त्यांनी भरारी पथकाच्या कार्रवाई वर सोडून चक्क विद्यार्थ्यांच्या पालकांनाच कॉपी न करू देण्याचे आवाहन करून टाकले.परीक्षा केंद्रांवरील सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संमतीमुळे परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तासातच प्रश्न पत्रिकेतील प्रश्नच बाहेर येवू शकते.यावर कार्रवाई न करता अश्या प्रकरणात गुन्हे दाखल होवू शकते का? भाषा करत आहे.विशेष म्हणजे याच बबनराव देशपांडे विद्यालयातून बारावीचा इंग्रजीचा प्रश्न पत्रिका पेपर सुरू होताच वाटसप वरून बाहेर आल्याची चर्चा समोर आली होती त्यामध्येही चौकशी मध्ये काहीच हाती न लागल्याचा हवाला देत माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांचे म्हणणे आहे.तर बबनराव देशपांडे विद्यालय हे भाजप सत्ताधाऱ्याची शाळा असल्याकारणाने शिक्षणाधिकारी या शाळेवर कार्रवाई करण्यापासून घाबरत असल्याचे बोलल्या जात आहे..

- बाईट:- 1) श्रीराम पानझाडे, शिक्षणाधिकारी ,बुलडाणा
2) नेटके,विस्तार अधिकारी यांचा स्ट्रीग व्हिडीओ

टीप:-बातमीत प्रश्न पत्रिकेतील प्रश्नाचे प्रत झेरॉक्स घेतांचे स्ट्रिंग व्हिडीओ पाठवीत आहे..

-वसीम शेख बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.