ETV Bharat / state

सिंदखेडराजातून एच.टी.बी.टी. कपाशी बियाणे जप्त, शेतकऱ्यावर गुन्हा दाखल - बंदी

सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथे बंदी असलेले एच.टी.बी.टी. कपाशी बियाण्याचे 21 पाकीट जप्त करण्यात आले आहे. कृषी विभाग, जिल्हा गुणनियंत्रण पथक व पोलिसांनी 18 जूनला कारवाई केली.

जप्त करण्यात आलेले बियाणे
author img

By

Published : Jun 21, 2019, 7:10 PM IST

बुलडाणा - सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथे बंदी असलेले एच.टी.बी.टी. कपाशी बियाण्याचे 21 पाकीट जप्त करण्यात आले आहे. विक्री करण्याच्या उद्देशाने आणलेल्या या पाकीटांवर कृषी विभाग, जिल्हा गुणनियंत्रण पथक व पोलिसांनी 18 जूनला कारवाई केली. याप्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात वसंता मुळे या शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जप्तीची अधिकाऱयांनी माहिती दिली

सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथे बंदी असलेले एच.टी.बी.टी. कपाशी बियाणे विक्री करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. यावरून मंगळवारी 18 जूनला कृषी विभाग, जिल्हा गुणनियंत्रण पथक व पोलिसांनी सापळा रचून उमरद येथील वसंता विनायक मुळे यांच्या घराची जप्ती पंचनाम्यातील पंचासह झडती घेतली. त्यात खोलीतील लोखंडी पेटीमध्ये आर कॉटन 18 बिबी 4 चे 20 पाकीट व आर कॉटन 81 बिबी 4 चे 1 पाकीट असे एकूण 21 पाकीटे प्रत्येकी 450 ग्रॅम वजनाचे आढळून आले. या पाकीटांची एकूण किंमत 15 हजार 330 रूपये आहे. 21 पाकीटांपैकी दोन पाकिटे नमूना घेण्याकरीता घेण्यात आली असून उर्वरित 19 पाकिटे जप्त करण्यात आली आहे.

प्रविण खर्चे यांच्या तक्रारीवरून या शेतकऱ्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्तीच्या कारवाईत बुलडाणा जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक प्रविण खर्चे, कृषी विभाग अधिकारी अनिसा महाबळे, जि प मोहीम अधिकारी विजय मुकाडे, सिंदखेडराजा कृषी अधिकारी वसंतराव राठोड, मंडळ कृषी अधिकारी रवी राठोड, पंचायत समिती कृषी अधिकारी कामाजी ठोंबरे, ठाणेदार जनार्धन शेवाळे, राजू दराडे, गजानन सानप आणि आम्रपाली सरकटे सहभागी होते.

Intro:Body:बुलडाणा:- सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथे भारतात बंदी असलेले एच.टी.बी.टी. कपाशी बियाणे विक्री करण्याच्या उद्देशाने आणलेले पाकीट जप्त करून वसंता मुळे शेतकऱ्याविरुद्ध किनगांव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर कार्रवाई मंगळवारी 18 जूनला कृषी विभाग व जिल्हा गुणनियंत्रण पथक व पोलिसांनी केली.

सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथे भारतात बंदी असलेले एच.टी.बी.टी. कपाशी बियाणे विक्री करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. यावरून मंगळवारी 18 जूनला बुलडाणा जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक प्रविण खर्चे, कृषी विभाग अधिकारी अनिसा महाबळे, जिप मोहीम अधिकारी विजय मुकाडे, सिंदखेडराजा कृषी अधिकारी वसंतराव राठोड, मंडळ कृषी अधिकारी रवी राठोड, पंस कृषी अधिकारी कामाजी ठोंबरे, ठाणेदार जनार्धन शेवाळे, राजू दराडे, गजानन सानप, आम्रपाली सरकटे यांनी सापळा रचून उमरद येथे वसंता विनायक मुळे यांच्या घरी अनधिकृत एच.टी.बी.टी.कापूस बियाण्यांचे बेकायदेशीर साठ्याबाबत माहिती मिळाल्यावरून जप्ती पंचनाम्यातील पंचासह उमरद येथील वसंता मुळे यांच्या घरी जाऊन घराची झडती घेतली असता खोली मध्ये लोखंडी पेटीमध्ये आर कॉटन 18 बिबी 4 चे 20 पाकीट व आर कॉटन 81 बिबी 4 चे 1पाकीट असे एकूण 21 प्रत्येकी 450 ग्रॅम असल्याचे आढळून आले. मालाची किंमत 15 हजार 330 रूपये आहे. 21 पाकीटापैकी दोन पाकिटे नमूना घेण्याकरीता घेण्यात आली असून उर्वरित 19 पाकिटे जप्त करण्यात आली आहे. प्रविण खर्चे यांच्या तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा शेतकऱ्याविरुद्ध किनगांवराजा पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दुय्यम ठाणेदार किशोर शेरकी करीत आहे. 

बाईट:- नरेंद्र नाईक,जिल्हा कृषी अधिकारी,बुलडाणा

-वसीम शेख,बुलडाणा-
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.