बुलडाणा - बुलडाणा नगर परिषदेच्या ( Buldana Nagar Parishad ) नगराध्यक्षा नजुनिस्सा मोहम्मद सज्जाद व निवडून आलेले नगरसेवक-नगरसेविकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ सोमवारी (दि. 3 जानेवारी) संपला. त्यामुळे शासनाच्या आदेशाने मुख्याधिकारी यांना प्रशासकाचा पदभार सोपविण्यात आला आहे. मात्र, पहिल्याच दिवशी नगर परिषदेच्या आवारात अग्नीशमन दलाच्या वाहनाच्या सहायाने पाण्याचा सडा मारण्यात आला. नगरसेवकांचे कार्यकाळ संपल्याने नगर परिषदेतील परिसर धुतल्याने नगर परिषदेचे शुद्धीकरण करण्यात आल्याची चर्चा नगर परिषदेच्या आवारात सुरू आहे. यामुळे मुख्याधिकारी, नगराध्यक्षा व नगरसेवकांमध्ये वाद उफाळण्याची शक्यता आहे. मात्र, रविवारी बाजार असल्याने काही जण नगर परिषदेच्या आवारातही भाजी व तत्सम विक्रीसाठी बसतात. यामुळे परिसर घाण होतो. म्हणून प्रत्येक सोमवारी नगर परिषदेच्या आवारात पाणी मारून परिसर स्वच्छ करण्यात येते, अशी प्रतिक्रिया उपमुख्याधिकारी गोरे यांनी दिली.
ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसींच्या प्रवर्गातील जागे संदर्भातील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्या नगर परिषदेचा कार्यकाळ संपण्याच्या मार्गावर असलेल्या नगर परिषदेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, देऊळगावराजा, चिखली, मेहकर व खामगाव या नऊ नगर परिषदेचे सध्या अस्तित्वात असलेल्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ हा 3 जानेवारीला संपत असल्यामुळे संपूर्ण बॉडी बरखास्त करून नगर परिषदेवर कामकाज करण्यासाठी प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी 3 जानेवारीला बुलडाणा नगर परिषदेवर मुख्यधिकारी गणेश पांडे हे प्रशासक म्हणून नियुक्त झाले आहे. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी नगर परिषदेच्या आवाराला फायरब्रिगेडच्या वाहनाने धुण्यात आले. यामुळे नगराध्यक्षा व नगरसेवक-नगरसेविकांचा कार्यकाळ संपल्याने हा एक प्रकारे शुद्धीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
बाजार असल्याने नगर परिषद परिसराची झालेली अस्वच्छतेला स्वच्छ केले - उपमुख्याधिकारी
रविवारी (दि. 2 जानेवारी) बुलडाणा शहराचा बाजार असल्यामुळे नगर परिषदेच्या परिसरात फेकलेल्या भाजीपाल्याने अस्वच्छता झाली होती. त्यामुळे सोमवारी 3 जानेवारीला नगर परिषदेला फायरब्रिगेडच्या माध्यमातून पाणी मारून स्वच्छ करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया बुलडाणा नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी गोरे यांनी दिली.
शुद्धीकरण करणे शोकांतिका, कारवाईची मागणी करणार - मो.सज्जाद
जनतेने मुस्लिम समाजाची नगराध्यक्षा नजमुनिस्सा यांना निवडून दिले आणि त्यांनी नगर परिषदेमध्ये पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. अन कार्यकाळ संपल्याच्या दिवशी अशा प्रकारे नगर परिषदेचे शुद्धीकरण करणे ही शोकांतिका आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे मुख्याधिकारी यांच्यावर कारवाईची करण्याची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा नजमुनिस्सा यांचे पती नगरसेवक मो. सज्जाद यांनी दिली.
असे नगराध्यक्षा असल्याने शुद्धीकरण - अरविंद होंडे
जनतेमधून असे नगराध्यक्षा निवडून आल्याचे बुलडाणेकरांचा दूर्भाग्य होते. शहर 10 वर्षे मागे गेला आहे. नगराध्यक्षा केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला दिसले. कोरोना काळात नगरध्यक्षांनी स्वतःला लॉक करून घेतले होते. ते कधी रस्त्यावर आले नाही. त्यांनी काहीच कामे केली नाही. सध्या बुलडाण्याची काय परिस्थिती आहे. असे नगराध्यक्ष असल्याने शुद्धीकरण केले असावे,अशी प्रतिक्रिया भाजपचे गटनेते नगरसेवक अरविंद होंडे यांनी दिली.
शुद्धीकरण योग्यच - काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस
नगराध्यक्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर नगर परिषदेचे शुद्धीकरण जनतेने करायला पाहिजे होते. मात्र, हे शुद्धीकरण नगर परिषदेने केले ते योग्यच आहे. त्यासाठी मुख्यधिकाऱ्यांचे धन्यवाद, सर्व जनतेला माहीत आहे की, नगराध्यक्षा नावपूरतेच होते. त्यांचे पती सगळेच कार्यभार चालवत होते आणि कोणाच्या आधिपत्या खाली, कोणाच्या आदेशाने चालवत होते. त्यांनी कोणकोणते टेंडर घेतले हे सगळ्यांनाच माहीत आहे. जे काही झालं योग्य झालं, आता येणाऱ्या काळात जनता अशी चूक न करता भविष्यात विवेक बुद्धी असणाऱ्या पक्षाच्या किंवा त्या व्यक्तीच्या हातात नगर परिषद देणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस यांनी दिली.
हे ही वाचा - Viral Video : पाहा... पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेंनी ज्येष्ठ नागरिकाला 'का' भरला दम