बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर शहरातील काही आईस्क्रीम पार्लरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या प्रेमाच्या आणाभाका घेण्याबरोबरच व अश्लील चाळे करत असल्याचे प्रकार वाढल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. त्या अनुषंगाने मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाने शहरातील माता महाकाली मार्गावरील एका आईस्क्रिम पार्लरवर छापा टाकली. त्या ठिकाणाहून 2 महाविद्यालयीन विद्यार्थी व 2 विद्यार्थिनींना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
मलकापूर शहरात गेल्या काही वर्षांपासून कॅफे शॉप व आईस्क्रीम पार्लरचा ऊत आला आहे. या ठिकाणी आतमध्ये असलेला झगमगाट व आलेल्यांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील महाविद्यालये, विद्यालये, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी याकडे आकर्षित होऊन त्या ठिकाणी प्रेम प्रकरणे व इतर चाळ्यांना वाव मिळत आहे. तसेच मलकापूर पसिरातील अनेक गल्लीबोळांमध्ये सुध्दा दुपारच्या वेळी कोचिंग क्लासेस तसेच कॉलेजच्या तरुण-तरुणींकडून सुनसान जागेचा गैरफायदा उचलत त्या ठिकाणी नको ते चाळे करतात. या बाबींना आळा घालण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र, त्यात यश न आल्याने याबाबत पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. यात आईस्क्रीम पार्लरच्या नावाखाली सुध्दा हाच गोरखधंदा मलकापूर शहरामध्ये सुरू असल्याच्या तक्रारी समोर आल्या. या मुळे मंगळवारी (दि. 21 जानेवारी) मलकापूर शहर पोलिसांच्या दामिनी पथकाने शहरातील माता महाकाली मार्गावरील एका आईस्क्रीम पार्लरवर छापा टाकला. यामध्ये अंधारात 2 मुले व 2 मुली एकांतात आढळून आले.
हेही वाचा - बुलडाणा जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड
त्याच्या विरोधात दामिनी पथकाकडून महाराष्ट्र पोलीस अॅक्ट नुसार कलम 110, 112 व 117 कारवाई करुन ताब्यात घेतले. त्यानंतर नियमानुसार विद्यार्थ्यांना पालकांच्या हवाली करण्यात आले.
हेही वाचा - कोट्यावधींचा घोटाळा करणाऱ्या पतसंस्थेचा अध्यक्ष खरात पोलिसांच्या जाळ्यात