ETV Bharat / state

प्रेमी युगुलाला मारहाणीच्या 'त्या' व्हिडिओची पोलिसांनी घेतली दखल, तपास सुरू - Buldhana crime

दोघेही नांदुरा बसस्थानकावर बसून बोलत असताना मुलीच्या चुलत भावाला ही बाब माहित झाली.  त्याने घटनास्थळावर जाऊन दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक
author img

By

Published : Apr 17, 2019, 5:33 PM IST

बुलडाणा - प्रेमी युगुलाला मारहाण झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची पोलीस प्रशासनाने तत्काळ दखल घेतली आहे. त्या प्रेमी युगुलाला शोधून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक

प्रेमी युगुलाचा शोध घेऊन त्यांची चौकशी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. या मुलाच्या वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी सांगितले आहे. सोशल मीडिया सेलने व्हायरल मीडियाची शहानिशा केल्याचेही त्यांनी सांगितले.

काय घडली होती घटना-
मारहाण करण्यात आलेले प्रेमी युगुल हे जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध या गावातील रहिवाशी आहे. तरुणी ही खामगाव येथे पॉलिटेक्निकची परीक्षा देत आहे. तर मुलगा कला पदवीची परीक्षा देत आहे. हे दोघेही नांदुरा बसस्थानकावर बसून बोलत असताना मुलीच्या चुलत भावाला ही बाब माहित झाली. त्याने घटनास्थळावर जाऊन दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Intro:Body:बुलडाणा :- बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील बस स्थानकावरील प्रेमी युगुलांना मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्याची पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेत या प्रेमी युगलांना शोधून पुढील कारवाई ला सुरुवात केली आहे

मारहाण करण्यात आलेली दोन्ही प्रेमी युगल हे जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध या गावातील रहिवासी असून मुलगी खामगाव येथे पॉलिटेक्निक ची परीक्षा देत आहे तर मुलगा बि ए ची परीक्षा देत आहे , हे दोघेही नांदुरा बस स्थानकावर बसून बोलत असताना मुलीच्या चुलत भावाला याची भनक लागली आणि त्यांनी घटना स्थळावर येऊन दोघांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलीसानी या प्रकरणाची तात्काळ दाखल घेत मुलामुलींचा शोध घेऊन त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. तर या मुलाचे वैद्यकीय तपासणी नंतर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटिल यांनी सांगितले आहे

बाईट :- डॉ दिलीप पाटील भुजबळ (पोलीस अधीक्षक , बुलडाणा)

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.