ETV Bharat / state

तरुण-तरुणीला मारहाण करणाऱ्या 'त्या' दोघांना अखेर अटक

तरुण-तरुणीला दोघांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपी साहेबराव वानखडे व भीमराव वानखडे यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.

तरुण-तरुणीला मारहाण करताना
author img

By

Published : Apr 19, 2019, 11:49 PM IST

बुलडाणा - नांदुरा बसस्थानकात तरुण-तरुणीला दोघांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. प्रसार माध्यमांनी हा व्हिडिओ प्रसारीत केल्याने याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती. अखेर मारहाण करणाऱ्या त्या दोन आरोपींना नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पोलीस ठाणे

नांदुरा बसस्थानकावर प्रेमाच्या भावविश्वात रममान झालेल्या तरुण-तरुणीला 15 एप्रिलला बेदम मारहाण करण्यात आली होती. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर प्रसार माध्यमांनी हा व्हिडिओ प्रसारित केला. पोलिसांनी मारहाण झालेल्या नरेश समाधान इंगळे (22) रा. धानोरा महासिद्ध याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

धानोरा येथून नांदुरा येथे 15 एप्रिलला एसटी बसने नोट्स घेण्यासाठी तो आला होता. यावेळी त्याला गावातील तरुणी बसस्थानकावर बसलेली दिसली. तो तिच्यासोबत बोलत असतानाच अनिल साहेबराव वानखडे व भीमराव वानखडे यांनी संशय घेऊन लाथाबु्क्यांनी त्याला मारहाण केली व रसवंतीवरील उसाने मारून जखमी केले. तसेच बेलाड फाट्यावरसुद्धा मारहाण केल्याची तक्रार नोंदविली. यावरून नांदुरा पोलिसांनी आरोपी साहेबराव वानखडे व भीमराव वानखडे यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Intro:Body:बुलडाणा:- नांदुरा बसस्थानक परिसरात एका युवक-युवतीला दोघांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.प्रसार माध्यमांनी हा व्हिडीओ प्रसारीत केला होता याची पोलिसांनी गंभीर दखल घेत अखेर मारहाण करणाऱ्या त्या दोन आरोपींना नांदुरा पोलिसांनी ताब्यात घेऊन मार खाणाऱ्या युवकाच्या फिर्यादी वरून त्यांच्या विरोधात कलम 323,504,506,34 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे..

१५ एप्रिल रोजी ही घटना नांदुरा बसस्थानकावर प्रेमाच्या भावविश्वात रममान झालेल्या प्रेमीयुगुलाला बेदम मारहाण करण्यात आली होती.याबाबतचा व्हिडीओ शोशल मीडियावर व्हायरल झाला होता.यावर प्रसार माध्यमांनी हा व्हिडीओ प्रसारित केला होता.यावर पोलीस प्रसारित केला होता यावर गंभीरता दाखवत पोलिसांनी मार खाणाऱ्या युवक नरेश समाधान इंगळे (२२) रा.धानोरा महासिद्ध याच्या फिर्याद दिली की, १५ एप्रिल रोजी धानोरा येथून नांदुरा येथे एस टी बसने नोट्स घेण्यासाठी आला असता त्याला गावातील तरुणी बसस्थानकावर बसलेली दिसून आली.यावेळी तिच्यासोबत बोलत असतांनाच अनिल साहेबराव वानखडे व भीमराव वानखडे यांनी संशय घेऊन संगनमत करून लाथाबु्क्यांनी मारहाण केली व रसवंतीवरील उसाने मारून जखमी केले.तसेच बेलाड फाट्यावरसुद्धा मारहाण केली.अशी फिर्याद नोंदविली यावरून नांदुरा पोलिसांनी आरोपी साहेबराव वानखडे व भीमराव वानखडे विरुद्ध वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली.

-वसीम शेख, बुलडाणा-
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.