ETV Bharat / state

बुलडाणा: अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार; दोघे अटकेत

मानसिकदृष्ट्या दुर्बल असलेली पीडित अल्पवयीन मुलगी मंगळवारी सायंकाळी काही वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी गावातीलच एका व्यक्तीने लग्नाचे आमीष देऊन निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या साथीदारानेही तिच्यावर अत्याचार केला.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
author img

By

Published : Dec 11, 2019, 12:47 PM IST

बुलडाणा - एका दिव्यांग आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना घडली. खामगाव शहरालगत असलेल्या घाटपुरी येथे हा प्रकार झाला. याप्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर तायडे आणि दत्ता साठे या दोघा आरोपींना अटक केली आहे.

मानसिकदृष्ट्या दुर्बल असलेली पीडित अल्पवयीन मुलगी मंगळवारी सायंकाळी काही वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी गावातीलच एका व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या साथीदारानेही तिच्यावर अत्याचार केला. खूप वेळ उलटल्यानंतरही मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पीडित मुलीने झालेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. गावात शोध मोहीम राबवून दोन आरोपींना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपीं विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत.

हेही वाचा - औरंगाबादमार्गे नागपूरला जाणार बुलेट ट्रेन? चाचपणीला सुरुवात

बुलडाणा जिल्ह्यातील खेर्डा येथे एका ५५ वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिचा निर्घृण करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणाच्या दहशतीतून बुलाडाणा बाहेर पडण्याअगोदरच मंगळवारी खामगावमधील घटना उघडकीला आली. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Intro:Body:Mh _bul_ Girl raped_10047

Story। : खामगाव येथे दिव्यांग व मानसिकरित्या कमजोर असलेल्या मुलीवर बलात्कार

लागोपाठ घटनांनी जिल्ह्यात खळबळ

बुलडाणा : खामगाव शहरालगत असलेल्या येथील घाटपुरी येथे एका राहणाऱ्या दिव्यांग व मानसिक रित्या कमजोर असलेल्या १६ वर्षीय बलिकेवर तेथीलच दोघा नराधमांनी बलात्कार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.
हैद्राबाद येथील अत्याचार प्रकरण आणि  बुलडाणा जिल्ह्यातील  जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे एका ५५ महिलेवर अत्याचार आणि त्यानंतर तिचा निर्घूण करण्यात आल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांच्या पडसादाचे मोहोळ शमत तोच, मंगळवारी रात्री खामगाव तालुक्यातील एका मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कुमारिकेवर दोघांनी अत्याचार केल्याचे समोर आले. घाटपुरी येथील मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेली एक अल्पवयीन युवती मंगळवारी सायंकाळी काही वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी गावातीलच एकाने तिने गाठले. लग्नाचे आमीष देऊन निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या साथीदारानेही तिच्यावर निर्जनस्थळी आणि परिसरातील एका झोपडीत अत्याचार केला. बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी न परतल्याने घरातील मंडळींनी शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला. आरोपींनी पीडित बालिकेला आम्ही तुझ्या सोबत लग्न करतो असे आमिष ही दिल्याचे समजते. दरम्यान तिने सर्व हकीकत कथन केल्यानंतर घरातील मंडळींनी तिला सोबत घेत, पोलिस स्टेशन गाठले. घटनेची माहिती मिळताच   पोलिस निरिक्षक रविंद्र देशमुख यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. गावात शोध मोहिम राबवून दोन आरोपींना अटक केली आणि दोन्ही आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. ज्ञानेश्वर तायडे आणि दत्ता साठे  अशी आरोपींची नावे आहे. आरोपी विरोधात भादंवी ३७६(डी), ३७६(२),(आय), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम -५ (ग), ५ (क) आणि कलम ६ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास शिवाजी नगर पोलिस करीत आहेत.

.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.