ETV Bharat / state

घरकूल योजनेसाठी सभापती कल्याणी शिंगणेंचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण - जिल्हा परिषद

घरकुलांच्या मागणीसाठी देऊळगाव राजा पंचायत समितीच्या सभापती कल्याणी गजेंद्र शिंगणे यांनी उपोषण सुरू आहे. मागण्या मान्य न केल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सभापती कल्याणी गजेंद्र शिंगणे
author img

By

Published : Jun 26, 2019, 1:57 PM IST

बुलडाणा - घरकूल योजनेतील घरे पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती सभापतींनी आज जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. कल्याणी गजेंद्र शिंगणे असे त्या उपोषणकर्त्या सभापतीचे नाव असून त्या देऊळगाव राजा पंचायत समितीच्या सभापती आहेत.

सभापती कल्याणी गजेंद्र शिंगणे

देऊळगाव राजा तालुक्यामध्ये प्रपत्र 'ब'मधील 324 अपूर्ण असलेली घरकुले पूर्ण झाली पाहिजे, रमाई घरकुलाचे 1356 घरकुले अपूर्ण असून त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, प्रपत्र 'ड' नुसार तालुक्यामध्ये 10630 घरकुलाचे अर्ज प्राप्त झाले असून, आजपर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. तात्काळ या अर्जाचा विचार करून गोरगरिबांना घरकुल देण्यात यावे, आदी मागण्यासाठी देऊळगाव राजा पंचायत समिती सभापती कल्याणी गजेंद्र शिंगणे यांनी बुलडाण्यात जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. जर या मागण्याचा शासन दरबारी विचार झाला नाही, तर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही शिंगणे यांनी दिला आहे. या प्रसंगी अनेक महिला उपस्थित होत्या.

Intro:Body:बुलडाणा - प्रपत्र ब मधील 324 अपूर्ण असलेली घरकुले पूर्ण झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी देऊळगाव राजा पंचायत समिती सभापती कल्याणी गजेंद्र शिंगणे यांनी आज मंगळवारी 25 जून रोजी बुलडाणा जिल्हा परिषद समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले..

देऊळगाव राजा तालुखक्यामध्ये रमाई घरकुलाचे 1356 घरकुले अपूर्ण असून त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, प्रपत्र ड नुसार तालुक्यामध्ये 10630 घरकुलाचे अर्ज प्राप्त झाले असून, आज पर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही, तात्काळ या अर्जाचा विचार करून गोरगरिबांना घरकुल देण्यात यावे या आधी मागण्यासाठी देऊळगाव राजा पंचायत समिती सभापती कल्याणी गजेंद्र शिंगणे यांनी बुलडाण्यात जिल्हा परिषद समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले, जर या मागण्याचा शासन दरबारी विचार झाला नाही व लाभार्त्याना घरकुले मिळाली नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील सौ. शिंगणे यांनी दिला आहे. या प्रसंगी अनेक महिला उपस्थित होत्या.

बाईट - कल्याणी शिंगणे
सभापती देऊळगाव राजा पंचायत समिती

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.