बुलडाणा- जिल्ह्यातील चार कोरोनाबाधित रुग्णांपैकी चिखली येथील एक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला सोमवारी 4 मे रोजी दुपारी सुट्टी देण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. मोहम्मद अस्लम यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रुग्णाचे स्वागत केले गेले..
सध्या केवळ तीन कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे.या उर्वरीत तीन रुग्णांनी बरे होण्याची वाट बुलडाण्याचे नागरिक पाहत आहे. कारण उर्वरित तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्यास बुलडाण्यात कोरोनाचे शुन्य रुग्ण असणार आहेत.
बुलडाणा जिल्हयात सोमवार 4 मे पर्यंत 24 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी आत्तापर्यंत 20 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.