बुलडाणा - कोविड महामारीच्या संकट काळातही रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या आपले मनोधैर्य वाढवणाऱ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभो आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळो अशीच प्रार्थना करत असतील. गुरुवारी वटपौर्णिमेच्या निमित्ताने बुलडाणा येथील कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देणाऱ्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी पूजाअर्चा केली.
परिचारिकांनी साजरी केली वटपौर्णिमा वटसावित्री पौर्णिमेचे महत्वभारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवाला महत्त्व आहे. सुहासिनीच कुंकू अबाधित राखणारा आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळू यासाठी वडाची पूजाअर्चा केली जाते. देवाकडे साकडे घालणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा आणि धागा बांधून वडाची पूजाअर्चा करतात. आणि जन्मोजन्मी हाच पती मिळू दे असं साकडं घालतात.
पतीनेच मनोधैर्य वाढवले कोरोना संकट काळामध्ये रुग्णसेवा करताना पतीनेच मनोधैर्य वाढवले. त्यामुळेच आपण हजारो कोरोना रुग्णांचे जीव वाचू शकलो, अशा शब्दात परिचारिकांनी नवऱ्याचे महत्व अधोरेखित केले. आपल्यालाही कोरोना झालेला असतांना ज्यांनी आपली साथ सोडली नाही असा नवरा जन्मोजन्मी मिळो अशी प्रार्थना त्यांनी यावेळेस केली. बुलडाणा येथील कोवीड सेंटरमध्ये काही परिचारिकांनी कोवीड सेंटरच्या परिसरात असलेल्या वटवृक्षाची पूजा-अर्चा केली.
हेही वाचा - पंतप्रधानांची जम्मू काश्मीरच्या प्रमुख १४ नेत्यांबरोबर साडेतीन तास चर्चा; 'या' आहेत प्रमुख मागण्या