ETV Bharat / state

एनआरसी, सीएए विरोधात बुलडाण्यात 'तिरंगा यात्रा' - राष्ट्रीय नागरिक नोंदणी

सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदवही विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे काही दिवसांपासून तीव्र निदर्शनं सुरू आहेत. येथील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण या कायद्याच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झालेले आहेत.

Buldana
बुलडाणा
author img

By

Published : Jan 26, 2020, 7:51 PM IST

बुलडाणा - शहरात राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात तिरंगा यात्रा काढण्यात आली. कुल जमाती तंजीम यांच्या वतीने 100 मिटरचा तिरंगा घेऊन ही यात्रा काढण्यात आली.

एनआरसी, सीएए विरोधात बुलडाण्यात 'तिरंगा यात्रा'

सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदवही विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे काही दिवसांपासून तीव्र निदर्शनं सुरू आहेत. येथील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण या कायद्याच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर बुलडाण्यातही शाहीन बागची निर्मिती करण्यात आली असून अनेक दिवसांपासून येथे आंदोलन सुरू आहे.

इंदिरा नगर येथून ही यात्रा संगम चौकातून जयस्तंभ चौकात स्थापित झालेल्या शाहीन बाग येथे पोहोचली. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या यात्रेत सहभाग घेतला होता. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

Intro:Body:बुलडाणा:- दिल्ली येथे nrc आणि caa कायद्याच्या विरोधात सुरू केलेल्या शाहीन बाग याच पार्श्वभूमीवर बुलडाण्यातील सुरू असलेल्या शाहीन बाग आंदोलनाला पाठींबा देत आज रविवारी 26 जानेवारी गणतंत्र दिनाच्या वर्धापन दिनी कुल जमाती तंजीम यांच्या वतीने बुलडाण्यात 100 मिटरचा भव्य तिरंगा मार्च काढून nrc आणि caa कायद्याच्या विरोध करण्यात आला.इंदिरा नगर येथून हा मार्च काढून संगम चौकातून जयस्तंभ चौकात स्थापित केलेले शाहीन बागला पोहचला.यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक,युवकांनी यावेळी सहभाग नोंदविला होता.या मार्चमध्ये केंद्र सरकार आणि nrc आणि caa च्या विरोधात प्रचंड घोषणा-बाजी करण्यात आली..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.