ETV Bharat / state

नवनिर्वाचित अध्यक्षांनी बैलगाडीतून प्रवास करुन जिल्हा परिषदमध्ये स्वीकारला पदभार

मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली होती. त्यानंतर १४ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या अध्यक्षा मनीषा पवार यांनी आपला पदभार स्वीकारला.

buldana
बैलगाडीतून प्रवास करून जिल्हा परिषदकडे जाताना जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार
author img

By

Published : Jan 16, 2020, 10:09 AM IST

बुलडाणा - जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मनीषा पवार यांनी १४ जानेवारीला पदभार स्वीकारला. यावेळी मनीषा पवार या बैलगाडीतून प्रवास करत जिल्हा परिषद आवारात पोहोचल्या. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रवेशाने जिल्हा परिषद परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले होते.

प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मनीषा पवार

मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली होती. त्यानंतर आज जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या अध्यक्षा मनीषा पवार यांनी आपला पदभार स्वीकारला. शिवसेनेचे कमल बुधवत यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा पदभार एक दिवस आधीच स्वीकारला होता. दरम्यान, १४ जानेवारीला जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथून काढण्यात आलेल्या रॅलीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा पवार या बैलगाडीमध्ये बसून जिल्हा परिषदेमध्ये पदभार स्वीकारायला पोहोचल्या. रॅलीत पवार यांच्याबरोबर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर प्रामुख्याने ग्रामीण भागातील विकासाला प्राधान्य देणार असल्याचे यावेळी अध्यक्षा मनिषा पवार यांनी सांगितले.

हेही वाचा- चिखली-अमडापूर मार्गावरील कार अपघातात दोन जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Intro:Body:बुलडाणा:- बुलडाणा जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडी च्या काँग्रेस च्या नवनिर्वाचित अध्यक्षा मनीषा पवार यांनी आज मंगळवारी 14 जानेवारीला पदभार स्वीकारलाय, यावेळी मनीषा पवार यांनी बैलगाडी मधून जिल्हा परिषद आवारात प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधले होते.

मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर आज जिल्हा परिषदे च्या महाविकास आघाडीच्या अध्यक्षा मनिषा पवार यांनी आपला पदभार स्वीकारला तर शिवसेनेच्या कमल बुधवत यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा पदभार हा एक दिवस आधीच स्वीकारला होता, आज जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथून बैलगाडी मध्ये बसून जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर महा विकास आघाडीच्या पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांसह रॅली काढण्यात जिल्हा परिषदेमध्ये पदार्पण केले,
पदभार स्वीकारल्यानंतर प्रामुख्याने ग्रामीण भागातील विकासासाठी प्राधान्य देणार असल्याचे यावेळी अध्यक्षा मनिषा पवार यांनी सांगितले.

बाईट - मनीषा पवार,नवनिर्वाचित अध्यक्षा जिल्हा परिषद बुलडाणा

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.