बुलडाणा - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1 हजारावर पोहचली असून, सोमवारी 55 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. कोरोनावर मात केल्याने 19 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 296 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 241 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 55 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 371 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
सोमवारी आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण -
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये ब्रम्हपुरी ता. चिखली : 60 वर्षीय पुरूष, दाताळा ता. मलकापूर : 52 वर्षीय महिला, बुलडाणा : तेलुगु नगर 78 वर्षीय पुरूष, डोंगरशेवली ता. चिखली : 48 वर्षीय महिला, देऊळगाव राजा : 42, 20 वर्षीय महिला, 18 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 60 व 28 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरूष, नांदुरा : 18 वर्षीय तरूणी, 60, 65 वर्षीय पुरूष, कृष्णा नगर 72 वर्षीय पुरूष, मारवाडी गल्ली 25 वर्षीय पुरूष आणि इतर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 55 रुग्णांचा समावेश आहे.
शिवाय उपचारादरम्यान खामगाव येथील 52 वर्षीय पुरूष व देऊळगाव राजा येथील 65 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 7 हजार 465 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 662 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 49 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 173 तर रॅपिड टेस्टमधील 68 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 241 अहवाल निगेटिव्ह आहेत.
सद्यपरिस्थिती -
114 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 7 हजार 465 आहेत. जिल्ह्यात एकूण 1060 कोरोनाबाधित रूग्ण असून, त्यापैकी 662 कोरोना रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 371 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 27 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.