ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटार-पंप चोरणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात - बुलडाणा गुन्हे वार्ता

शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीतून मोटार-पंप चोरी करणाऱ्या चोरट्याला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने बुधवारी अटक केली.

motor-pump-thief-arrested-by-the-local-crime-branch-in-buldana
शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटार-पंप चोरणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
author img

By

Published : Nov 13, 2020, 6:19 PM IST

बुलडाणा - चिखली तालुक्यातील अमडापूर येथील शेतकऱ्यांच्या विहिरींवरील मोटार-पंप चोरणाऱ्या चोरट्याला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने बुधवारी अटक केली. त्याच्याकडून 45 हजारांचे तीन मोटार-पंप हस्तगत करण्यात आले. राहुल देविदास महापूरे (48) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

अमडापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीतून मोटार-पंप चोरी जाण्याचा प्रमाण वाढले होते. याप्रकरणी शेतकऱ्यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी करताना अमडापूर येथील राहुल देविदास महापूरे याच्याजवळ चोरी गेलेले मोटार-पंप असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला बुधवारी संध्याकाळी ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता, त्याने मोटार-पंप चोरल्याची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडून 45 हजारांचे तीन मोटार-पंप हस्तगत करण्यात आले.

हेही वाचा- विजेचा प्रवाह सोडून मासे पकडणे पडले महागात, दोन युवकांचा शॉक लागून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.