बुलडाणा - जिल्ह्यात बुलडाणा सामान्य रुग्णालयातील मॉक ड्रिलचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या व्हिडीओमुळे नागरिकांनध्ये बुलडाण्यात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याच्या अफवांनी जोर धरला आहे. तर, या सर्व प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाचा बेजबाबदारपणाही समोर आला आहे.
कोरोनाचा रुग्ण रुग्णालयात आल्यावर काय-काय उपाय करावे, याबाबत बुलडाणा सामान्य रुग्णालयात शासनातर्फे प्रात्यक्षिक म्हणजे मॉक ड्रिल करण्यात आले होते. मात्र, या मॉक ड्रिलचा व्हिडीओ बुलडाण्यात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याच्या पोस्टसह व्हायरल करण्यात आला आहे. या अफवेमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - जनता कर्फ्यू : डॉ.राजेंद्र शिंगणेंनी सहपरिवार मानले अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार..
सदर मॉक ड्रिल ही बुलडाणा रुग्णालयात रविवारी जनता कर्फ्यूच्या दुपारी १२ च्या सुमारास झाली. दरम्यान, जिल्ह्यात एकही कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसून सदर व्हिडीओ हा बुलडाणा सामान्य रुग्णालयातील मॉक ड्रिलचा व्हिडीओ असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, यामुळे जिल्ह्यात एकूणच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिला आहे.
हेही वाचा - कोरोना व्हायरस: बुलडाण्यात 'जनता कर्फ्यू'ला उत्स्फूर्त प्रतिसाद...