ETV Bharat / state

Satej Patil Criticizes DCM : मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीत; आमदार सतेज पाटलांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टोला - काँग्रेसचे आमदार सतेज पाटील

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय दिल्लीत होतो, असे म्हणत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. दिल्लीकरांच्या मनात काय आहे, यावर सर्व काही अवलंबून असल्याचे देखील पाटील म्हणाले.

Satej Patil Criticizes DCM
Satej Patil Criticizes DCM
author img

By

Published : Jul 22, 2023, 6:06 PM IST

सतेज पाटील यांची पत्रकार परिषद

कोल्हापूर : राज्यातील मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीत निर्णय होतो. दिल्लीच्या मनात काय आहे यावर सर्व गोष्टी ठरतात, अशी टीका काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते. भावी मुख्यमंत्री म्हणून झळकलेल्या बॅनरवर देखील त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. सध्या राज्याचे अधिवेशन सुरू असून विरोधक सरकारला विविध प्रश्नांवर घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काही प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत, असे शासनाने ठरवले आहे. अनुदानाचा विषय असो किंवा शिक्षक भरतीचा. अद्याप शिक्षक भरती झाली नाही. अनेक विषय आहेत, ज्यांना बगल देण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे.

विरोधक आमदारांना शून्य टक्के निधी : विरोधीपक्षाच्या आमदारांना शून्य टक्के निधी देणे, हा बजेटमध्ये झालेला अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. राज्याच्या इतिहासात असे कधीही झालेले नाही. सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. मात्र, विरोधक आमदारांना निधी सरकार देत नाही. सध्याचे सरकार हे केवळ 200 मतदार संघातील सरकार असल्यासारखे वाटत आहे, असे पाटील म्हणाले. सरकार सत्ताधारी आमदारांना 100 टक्के देते आहे, तर विरोधकांना शून्य टक्के निधीचे धोरण सरकारचे असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडी जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे.

मणिपूरचा प्रश्न आता गंभीर : गेल्या काही महिन्यांपासून धगधगत असलेला मणिपूरचा प्रश्न आता गंभीर होत आहे. विरोधकांनी भाजप सरकारला चांगलेच फैलावर घेतले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ अतिशय अस्वस्थ करणारा आहे. ही घटना घडल्यानंतर सरकारला माहिती नव्हती, असे नाही. इंटरनेट बंद असल्याने ही घटना पुढे आली नाही. मात्र, आता इंटरनेट सेवा पुन्हा सुरू झाल्याने हा व्हिडिओ पुढे आल्याचे पाटील म्हणाले. दीड महिन्यापूर्वी घडलेल्या या घटनेबाबत गृहमंत्र्यांनी राज्यपालांना अहवाल दिला होता का? हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला का? हे तपासायला हवे, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे. जवानाच्या पत्नीला या प्रकाराला सामोरे जावे लागत असेल तर देशाचे कायदे सक्षम आहेत का? हे तपासण्याची गरज आहे, असे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - Assembly Monsoon Session 2023 : विरोधी पक्षनेत्याविना विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; नेता न निवडण्याची 'ही' आहेत कारणे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.