ETV Bharat / state

आमदार गायकवाडांच्या 'त्या' वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

बुलडाणा विधानसभा मतदार क्षेत्राचे शिवसेनेच्या आमदार संजय गायकवाड यांनी पातळी सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे पडसाद बुलडाणा जिल्ह्यात उमटायला सुरुवात झाली आहे. बुलडाण्याचे भाजपचे नेते विजयराज शिंदे यांनी आमदार गायकवाडांचा निषेध व्यक्त केला.

आमदार गायकवाडांच्या 'त्या' वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात

author img

By

Published : Apr 18, 2021, 7:10 PM IST

बुलडाणा - बुलडाणा विधानसभा मतदार क्षेत्राचे शिवसेनेच्या आमदार संजय गायकवाड यांनी पातळी सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे पडसाद बुलडाणा जिल्ह्यात उमटायला सुरुवात झाली आहे. बुलडाण्याचे भाजपचे नेते विजयराज शिंदे यांनी आमदार गायकवाडांचा निषेध व्यक्त केला. गायकवाड आज रोजी फक्त भाजपामुळेच आमदार झाले आहेत हे त्यांनी विसरू नये. या शिवसेनेच्या भरवशावर ते साधे नगराध्यक्ष ही होऊ शकले नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवाव आणि भाजपाचा आदर करावा, असे पलटवार करीत आमदार गायकवाडांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी विजयराज शिंदे यांनी केली.

आमदार गायकवाडांच्या 'त्या' वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात
तर भाजपचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ.संजय कुटे यांनी आमदार संजय गायकवाडांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत जिल्ह्यातील जळगांव जामोद येथे संजय गायकवाड मुर्दाबादच्या घोषणा देत आमदार गायकवाडांचा प्रतिकात्म पुतळा जाळला. बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे पदाधिकारी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टिका केली होती. "मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर ते देवेंद्र फडविणसांच्या तोंडात कोंबले असते", असे व्यक्तव्य केल्याने त्याचे पडसाद जिल्हाभर उमटत आहे.
संजय गायकवाड हे भाजपच्या भरवशावर आमदार-
आमदार संजय गायकवाड हे भाजपा पक्षावर टीका करतात मात्र ते आज रोजी फक्त भाजपा मुळेच आमदार झाले आहेत हे त्यांनी विसरू नये, या शिवसेनेच्या भरवशावर संजय गायकवाड हे साधे नगराध्यक्ष ही होऊ शकले नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवाव आणि भाजपाचा आदर करावा, असा सूचक टोला भाजपचे नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी गायकवाडांना लगावलाय. यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करावे अन्यथा भाजपा कार्यकर्ते आमदार संजय गायकवाड यांना सबक शिकवतील. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस राहतील, असा इशारा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी दिला आहे.
सोमवारी जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होईपर्यत करणार ठिय्या-
आमदार या लोकप्रतिनिधी पदाला न शोभणारी वक्तव्य या गलिच्छ आणि गावातल्या मवाली सारख्या वागणाऱ्या आमदारांनी केलेल आहे. आज पूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये सर्व जनतेमध्ये त्याचा तीव्र असंतोष आणि निषेध व्यक्त होतो आहे. उद्या सोमवारी जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये पूर्ण जिल्हाभर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात येईल. जोपर्यंत आमदार गायकवाडांवर पोलीस गुन्हे दाखल करणार नाही, अटक करणार नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन चालू राहणार, अशी प्रतिक्रीया माजी मंत्री डॉ.संजय कुटे यांनी दिली आहे.

हेही वाचा - हृदयद्रावक..! पुण्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.