बुलडाणा- महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनामध्ये एकदम सुरळीत काम करत आहे. महाविकास आघाडीची ताकद आणखी वाढली पाहिजे. त्यासाठी आपण सगळेच व्यवस्थित राहिलो तरच आघाडीमध्ये ती ताकद राहील, असे म्हणत सामनातून काँग्रेसवर निशाणा साधल्याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. त्या खामगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या सत्कारांसाठी आल्या होत्या. त्यावेळी बोलत होत्या.
'तर महाविकास आघाडीची ताकद कायम राहील, मंत्री ठाकुरांचा संजय राऊतांना टोला' - शिवसेना खासदार संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या पक्षाच्या सामना या मुखपत्रात काँग्रेस पक्षावर निशाणा साधत सेक्युलरिज्म आणि औरंगाबाद शहराच्या नामकरणाबाबत टीका केली होती. यावर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पक्षाकडून समोर येऊन खा.संजय राऊत हे ईडीच्या माध्यमातून भाजपच्या दबावाखाली आहेत की काय? अशी टीका नुकतीच केली होती.