ETV Bharat / state

बुलडाणा : शिक्षण विभागाची परवानगी न घेताच शाळेचे स्थलांतर - मांऊट सिनाई शाळा खामगाव

सध्या एका भाड्याच्या इमारतीमध्ये मांऊट सिनाई शाळा सुरू आहे. ही इमारत धोकादायक असल्याने शहर पोलिसांच्या तक्रारीवरून शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेच्या चौकशीचे आदेश दिले होते. कारणे दाखवा नोटीशीला शाळा प्रशासनाने उत्तर न दिल्याने आता सदर शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

shala
शिक्षण विभागाची परवानगी न घेताच शाळेचे स्थलांतर
author img

By

Published : Nov 29, 2019, 6:39 PM IST

बुलडाणा - खामगाव शहरातील टिचर कॉलनीत सुरू असलेल्या मांऊट सिनाई इंग्रजी शाळेचे शिक्षण विभागाच्या परवानगीविना स्थंलातर करण्यात आले आहे. सध्या एका भाड्याच्या इमारतीमध्ये ही शाळा सुरू आहे. ही इमारत धोकादायक असल्याने शहर पोलिसांच्या तक्रारीवरून शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेच्या चौकशीचे आदेश दिले होते. कारणे दाखवा नोटीशीला शाळा प्रशासनाने उत्तर न दिल्याने आता सदर शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शिक्षण विभागाची परवानगी न घेताच शाळेचे स्थलांतर

मोहमद इमरान मोहमद इकबाल आणि मोहमद इरफान मोहमद इकबाल यांनी ही शाळा अनअधिकृतपणे चालवली जात असल्याची तक्रार शहर पोलिसांकडे केली होती. मांऊट सिनाई शाळा गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या शाळेला मान्यताही आहे. मात्र, मान्यता असलेल्या ठीकाणी शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने शाळा तात्पुरत्या स्वरूपात टिचर कॉलनीत हलवण्यात आली होती. यासाठी एक इमारत भाड्याने घेण्यात आली आहे.

हेही वाचा - प्राथमिक शाळेत 'रोबो टिचर'... 'अ‌ॅलेक्सा' शिक्षिकेमुळे विद्यार्थी पटापट बोलू लागले इंग्रजी

संबंधीत शाळा टिचर कॉलनीत हलवण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी कींवा शिक्षण विभागला कळवण्यात आले नव्हते. त्यामुळे शहर पोलिसांनी संबंधित शाळेविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदविली होती. दरम्यान, सदर शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी इ.झेड. खान यांनी सांगितले आहे.

Intro:Body:mh_bul_Unauthorized transfer of school_10047

Slug : शिक्षण विभागाची परवानगी न घेताच शाळेचे स्थलांतर!
विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका
चौकशी अहवाल धूळखात पडून : शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
शाळा मान्यता रद्द करण्याचा शासनाकडे जाणार प्रस्ताव

बुलडाणा : खामगाव शहरातील टिचर कॉलनीत सुरू असलेल्या एका इंग्रजी शाळेचे शिक्षण विभागाच्या परवानगी विना स्थंलातर करण्यात आले. सध्या विद्यार्थ्यांच्या जीवाईटास धोका होईल अश्या इमारतीमध्ये हि अनधिकृतपणे शाळा सुरु असून याप्रकरणी शहर पोलिसांच्या तक्रारीवरून शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या प्रकरणातील चौकशी अहवाल मागील दोन महिन्यांपासून धूळखात पडून असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र झोपलेल्या शासनाला जागे केल्या नंतर आता सादर शाळेच्या मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील टिचर कॉलनीत १ सप्टेंबर २०१९ पासून मांऊट सिनाई ही इंग्रजी माध्यमाची शाळा अनधिकृतपणे चालविण्यात येत असल्याची तक्रार शहर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलिसांनी तक्रारकर्ते मो. इमरान मो. इकबाल रा. टिचर कॉलनी, मोहमद इरफान मो. इकबाल यांच्यासह नगर सेवक शेख याकुब शेख महेबुब रा. इकबाल चौक, सराफा लाईन वार्ड नं.१ बुलडाणा आणि शेख ताहेर शेख याकुब रा. बुलडाणा यांचे बयाण नोंदविले. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष शेख याकुब आणि संस्थेचे सदस्य शेख ताहेर शेख याकुब यांनी खामगाव येथे मांऊट सिनाई ही इंग्रजी माध्यमाची शाळा गत चार वर्षांपासून सुरू आहे. या शाळेला शाळेची मान्यताही आहे. मात्र, मान्यता असलेल्या वाडी या गावातील शाळा इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने ही शाळा तात्पुरत्या स्वरूपात टिचर कॉलनीत हलविण्यात आली. यासाठी भाडेतत्वावर एक इमारत भाड्याने घेण्यात आली. मात्र, संबंधीत शाळा टिचर कॉलनीत हलविण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी तथा शिक्षण विभाग बुलडाणा कळविलेले नसल्याचे बयाण नोंदविले. त्याअनुषंगाने शहर पोलिसांनी संबंधित शाळेविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदविली. तसेच तक्रारकर्ते मो. इमरान मो. इकबाल यांनीही शिक्षण विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांनी ७ सप्टेंबर २०१९ रोजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, खामगाव यांना शाळेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून याप्रकरणी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. मात्र झोपलेल्या शासनाला जागे केल्या नंतर आता सादर शाळेच्या मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी ई झेड खान यांनी सांगितले

चौकट -
शासनाची परवानगी असलेल्या शाळेचे स्थलांतर करण्यापूर्वी शिक्षण विभागाला हमी पत्र दिले आहे. शाळेचे बांधकाम पूर्ण होताच ही शाळा वाडी येथे (मान्यता असलेल्या ठिकाणी) हलविण्यात येईल.

- शेख ताहेर
उपाध्यक्ष-माउंट सिनाई इंग्लीश स्कूल.

चौकट -

शाळेला ज्या ठिकाणी मान्यता आहे त्या ठिकाणी सदर शाळा सुरू नाही असा चौकशी अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यावरून शाळेला करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यावर शाळेकडून कुठलेच उत्तर मिळाले नाही त्यामुळे आता सादर शाळेची मान्यता रद्दच प्रस्ताव शासनाकडे पाठवीत अआहोत.

- इ. झेड खान, शिक्षणाधिकारी प्राथमिक, बुलडाणा

- फहीम देशमुख, खामगावConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.