बुलडाणा - दरोडयासारख्या गंभीर गुन्ह्याचा कट मेहरकर पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी सुलतानपूर ते मेहकर रोडवरील सुलतानपूर नदीपुलाजवळून 7 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून टाटा सफारीसह 1 लाख 9 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सुलतानपूर ते मेहकर रोडवरील सुलतानपूर नदीपुलाजवळ शुक्रवारी दुपारी टाटा सफारी उभी होती. वाहनामध्ये असलेल्या ८ व्यक्तींकडे लोखंडी हत्यार असून ते कोणाला तरी लुटण्याच्या तयारीने असल्याची खात्रीलायक माहीती मेहकर पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रभाकर सानप , पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती सानप , गणेश लोढे , राजेश उंबरकर , विजय आंधळे हे पोलीस वाहनासह दोन पंचांना घेऊन घटनास्थळ गेले. घटनास्थळांवरून 3 आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत दोघांना अटक केले आहे. एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. या 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-व्वा रे पठ्ठ्या... मिरचीच्या पिकावर फवारली देशी दारू!
हा मुद्देमाल जप्त-
मेहकर पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल फोन , दोन लोखंडी रॉड एक लोखंडी पाईप, मिरची पावडर, दोन देशी दारू बॉटल , पिवळ्या धातुचा गिन्या ( नकली सोने ) एकूण नग 405 व वजन अंदाजे 630 ग्राम आहे. ही कामगिरी मेहकर पोलिसांनी शुक्रवारी (20 नोव्हेंबर) केली आहे.
हेही वाचा-'येत्या काही वर्षात भारताचा वेगाने अर्थिक विकास होईल'
पकडण्यात आलेले आरोपींची नावे
1 ) बळीराम पुंडलीक चव्हाण (वय 55 वर्ष रा. धदम ता. खामगाव) 2 ) रविद्र प्रभु भोसले (वय 28 वर्ष रा .ध दम ता. खामगाव) 3 ) राष्ट्रपाल देवानंद जाधव (वय 26 रा. धदम ता. खामगाव) 4) अकाश मानिकराव चव्हाण (वय 18) 5 ) दिलीप ज्ञानेश्वर चव्हाण (वय 22 वर्ष रा.लाखणवाडा ता. खामगाव) 6 ) सतिष मोहन पवार (वय 19 रा. जयरामगड ता. खामगाव) 7 ) करविंद भिका चव्हाण (वय 14 वर्ष रा . धदम ता. खामगाव) असे आहे. पळून गेलेल्या आरोपीचे नाव गणेश राठोड असे आहे. हा आरोपी तो लाखणवाडान ता. खामगाव येथील रहिवासी आहे. दरम्यान पोलिसांनी 7 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध मेहकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.