नागपूर : नागपूरवरुन निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स या बसचा सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा येथे झालेल्या भीषण अपघातात तब्बल 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बसचा टायर फुटून बस डिव्हायडरला धडकल्यानंतर बसने पेट घेतल्यामुळे या प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र या प्रवाशांचे मृतदेह जळून कोळसा झाला, तर काही मृतदेह अर्धवट जळाल्याचे हृदयद्रावक दृष्य घटनास्थळावर दिसत आहे. ही बस कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. जेवण करुन नागपूरवरुन चालवत आलेल्या चालक बदलून दुसऱ्या चालकाने गाडीचा ताबा घेतला. तर नागपूरवरुन गाडी चालवत आलेला चालक गाडीत झोपला. मात्र ती झोप अखेरची ठरली. या अपघातातील मृतांची नावे प्रशासनाने जाहीर केली आहेत. त्यांची यादी येथे देत आहे.
कसा झाला अपघात : विदर्भ ट्रॅव्हल्सची खासगी बस क्रमांक एस एच 29 बीई 1819 ही नागपूरवरुन पुण्याला जात होती. या बसमध्ये 33 प्रवाशी प्रवास करत होते. यात सर्वाधिक प्रवाशी वर्धा येथील तर यवतमाळवरुन सात प्रवाशी बसले होते. नागपूरवरुन सुटलेली ही बस कारंजा येथे जवणासाठी थोडा वेळ थांबली होती. त्यानंतर जेवण करुन या गाडीचा चालक बदली झाला. बदली चालकाने ही बस पुण्याकडे नेत असताना सिंदखेड राजा येथे गाडीचा टायर फुटल्याचा दावा चालकाने केला आहे. गाडीचा टायर फुटल्यानंतर ही बस डिव्हायडरला जाऊन धडकल्याची घटना शनिवारी रात्री 01.15 च्या दरम्यान घडली. त्यानंतर रोडवर असलेल्या खांबाला जाऊन धडकली. त्यानंतर डिझेलच्या टँकचा स्फोट झाल्याने गाडीने लगेच पेट घेतला. त्यामुळे भीषण आग लागून गाडीतील 25 प्रवाशांचा मृत्यू झाला.
झोपेत असल्याने प्रवाशांचा मृत्यू : नागपूरवरुन निघालेली विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसमधील प्रवाशी झोपेत होते. त्यामुळे अपघातानंतर प्रवाशांना बाहेर पडणे कठीण झाले. त्यातच गाडी घासत गेल्याने गाडीचा दरवाजा तुटला. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडायला मार्गच उरला नाही. दुसरीकडे गाडीला भीषण आग लागल्याने प्रवाशी होरपळले गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
मृतांच्या वारसांना पाच लाखाची मदत : विदर्भ ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातात 25 प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातातील मृतांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या वारसांना सरकारकडून पाच लाखाची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
हेही वाचा -