ETV Bharat / state

महाराष्ट्र दिन सोशल डिस्टन्सिंग पाळत साजरा, पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण - COVID-19

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा अत्यंत साधेपणाने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व राष्ट्रगीताने मानवंदना दिली.

महाराष्ट्र दिन सोशल डिस्टन्सिंग पाळत साजरा

author img

By

Published : May 1, 2020, 3:31 PM IST

बुलडाणा - कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा अत्यंत साधेपणाने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. सोशल डिस्टन्सिंग पाळत बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व राष्ट्रगीताने मानवंदना दिली.

महाराष्ट्र दिन सोशल डिस्टन्सिंग पाळत साजरा, पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण

जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील–भुजबळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी आदींची उपस्थिती होती.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना हाती घेण्यात आले आहे. यावर्षीचा महाराष्ट्र दिन कार्यक्रम अत्यंत साधेपणाने झाला. राज्य शासनाच्या सूचनेनुसार, जिल्हा मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहण झाले. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोशल डिस्टन्सिंग पाळत ध्वजारोहण सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.