ETV Bharat / state

इराणकडून लोणार सरोवराला 'रामसर' स्थळ म्हणून घोषित

जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवराला ईराणने रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. येत्या आठवड्यात रामसरचे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.

लोणार सरोवर
लोणार सरोवर
author img

By

Published : Nov 18, 2020, 9:42 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील बेसाॅल्ट खडकावर उल्कापाताने तयार झालेले जगातील प्रसिद्ध लोणार सरोवराबाबत आनंदाची बातमी आहे. इराणने लोणार सरोवराला 'रामसर' स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. 'रामसर'च्या संकेतस्थळावर या विषयीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून वन विभागानेही याला दुजोरा दिला आहे. जगातील जैवविविधतेने महत्वपूर्ण असलेल्या पाणथळ जागांना आंतरराष्ट्रीय 'रामसर' स्थळाचा दर्जा देण्यात येतो. नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर या पक्षी अभयारण्याच्या रुपाने या वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्राला पहिले 'रामसर' स्थळ मिळाले होते. आता हा दर्जा लोणार सरोवराला मिळाला आहे. लोणार अभयारण्य हे महाराष्ट्रातून घोषित झालेले दुसरे 'रामसर' स्थळ आहे.

केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रायलाने लोणार सरोवराला 'रामसर'चा दर्जा दिल्याची माहिती 'रामसर'च्या संकेतस्थळावरही यासंबंधीची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. येत्या आठवड्यात 'रामसर'चे प्रमाणपत्र प्राप्त होईल. लोणार सरोवराच्या संवर्धनाच्या दृष्टीने राज्यासाठी ही अभिमानाची व आनंदाची बाब असून यामुळे लोणारच्या संवर्धनाला मोठा हातभार लागणार आहे. लोणार सरोवर हे भारतातील 41 वे 'रामसर' स्थळ आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे बेसाॅल्ट खडकावर उल्कापाताने तयार झालेले जगातील तिसऱ्या क्रमांकाचे एकमेव सरोवर आहे. यामधील पाणी अल्कधर्मी असून हे सरोवर 137 मीटर खोल आणि 1.8 किमी रुंद आहे. सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती आहे. हे सरोवर अतिवेगवाने भूभागावर आदळलेल्या उल्केमुळे तयार झाले आहे. त्याच्या निर्माणाच्या वर्षाबाबत बरेच अंदाज आहेत. थर्मोल्युमिनेसेन्स तंत्रज्ञानावरुन काढलेले वय अंदाजे 52 हजार वर्ष आहे. तर अलीकडील अरगाॅन डेटिंग वापरुन काढलेले वय 5 लाख 47 हजार वर्षांचे आहे. हे सरोवर आणि त्याच्या आसपासच्या परिसराला अभयारण्याचा दर्जा असून आता 'रामसर'चा दर्जा प्राप्त झाल्याने या स्थळाच्या पर्यटकीय व अन्य विकासास प्राधान्य मिळणार असल्याचे काकोडकर यांनी सांगतिले. आजबाजू्च्या वस्त्यांमधून या सरोवरात सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे येथील प्रदूषणाचा मुद्दा अधोरेखित करुन मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भातील खटला सुरू आहे. सांडपाण्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. आता 'रामसर' स्थळाचा दर्जा प्राप्त झाल्याने या समस्येचे निराकरण लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. भविष्यात या जागेचे संवर्धन योग्य पद्धतीने न झाल्याचे 'रामसर' प्रमाणपत्र रद्द देखील होऊ शकते.

रामसर म्हणजे काय ?

1971 साली इराणमधील ’रामसर’ शहरात ‘रामसर परिषद’ पार पडली. या परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करावे, असे ठरले. यासाठी पाणथळ जागेच्या कक्षेत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा समावेश करण्यात आला. भारताने ’रामसर’ करारावर 1982 साली सही करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचलले. सध्या जगातील 2 हजार 410 पाणथळींना ’रामसर’चा दर्जा प्राप्त आहे. आजवर भारतातील 41 पाणथळींना ’रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.