बुलडाणा - अखिल भारतीय किसान सभा खामगाव तालुका कमिटीच्या वतीने खामगाव तहसीलवर निदर्शने करण्यात आली. ऐतिहासीक शेतकरी संपाच्या द्वितीय वर्धापन दिनाचे निमित्त साधून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पाण्याचा प्रश्न, पिक विमा आदी मागण्या प्रशासना समोर मांडण्यात आल्या.
बुलडाणा जिल्ह्यात भयानक दुष्काळ परीस्थीती निर्माण झाली आहे. संपूर्ण शेतकऱयांची कर्जमाफी झालेली नाही. जनावराच्या चाऱयाचा व पाण्याचा प्रश्न जटील बनला आहे. माणसांना पिण्याच्या पाण्याकरीता भटकंती करावी लागत आहे. शेतकरी पिककर्जापासून वंचीत आहे. पिकविमा सुध्दा मिळाला नाही.
शेतकऱयांचे ज्वलंत प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा खामगाव तालुका कमिटीच्या वतीने खामगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोपडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.