बुलडाणा - मोदी सरकार- २ चा पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला होता. यामध्ये त्यांनी उत्पादन आयात शुल्क वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार असल्याची माहिती दिली होती.त्यानुसार पेट्रोल व डिझेलच्या दरात जवळपास अडीच रुपयांची वाढ झाली आहे.
त्याप्रमाणे राज्यात पेट्रोलचे आणि डिझेलचे दर भडकले आहेत. पेट्रोल आणि डिझेलवरील कस्टमड्युटी एक रुपयांनी वाढवल्यामुळे ही दरवाढ झाली आहे. या दरवाढीमुळे नागरिकांच्या खिशाला अजून कात्री लागणार असून त्यामुळे महागाई सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. या दरवाढीमुळे बुलडाण्यात दोन रूपयांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. यावर शहरातील सर्वसाधारण लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, हे जाणून घेतले 'ईटिव्ही भारत' चे प्रतिनिधी वसीम शेख यांनी.