ETV Bharat / state

धाडमध्ये आधार कोविड केअर सेंटरचे केंद्रीय मंत्री दानवे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

author img

By

Published : May 29, 2021, 9:16 AM IST

धाड येथील सहकार विद्या मंदिराच्या शाळेच्या प्रशस्त वास्तूमध्ये, आमदार श्वेता महाले यांच्या वतीने शासन व लोकसहभागातून दिवंगत दयासागरजी महाले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आधार कोविड सेंटर सुरू होत आहे. हे कोविड सेंटर 50 बेडचे सर्वसामान्य पॉझिटिव्ह रुग्णांसाठी असणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शासकीय नियमाप्रमाणे पूर्ण उपचार मोफत करण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री दानवे
केंद्रीय मंत्री दानवे

बुलडाणा - राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामुळे रुग्णांना बेडचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर दिवंगत दयासागरजी महाले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, आमदार श्वेता महाले यांच्या प्रयत्नाने धाड येथे आधार कोविड केअर सेंटर सुरू होत आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन आज (शनिवारी) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते होणार आहे. आजपासून हे 50 बेडचे कोविड केअर सेंटर रुग्णांच्या सेवेत रुजू होणार आहे .

या कार्यक्रमासाठी भाजपाचे माजी पालकमंत्री आमदार संजय कुटे , जिल्हाध्यक्ष आमदार अॅड आकाश फुंडकर , माजी आमदार चैनसुखजी संचेती , बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक , प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सांगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

धाड येथील सहकार विद्या मंदिराच्या शाळेच्या वास्तूमध्ये सुरू होणार कोविड सेंटर

धाड येथील सहकार विद्या मंदिराच्या शाळेच्या प्रशस्त वास्तूमध्ये हे कोविड सेंटर सुरू होत आहे. यामध्ये 50 बेड सर्वसामान्य पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी असणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शासकीय नियमांप्रमाणे पूर्ण उपचार मोफत करण्यात येणार आहे. उपचारासाठी लागणारी औषधे, तपासण्या, नाष्टा , जेवण सुद्धा मोफत देण्यात येणार आहे. आमदार श्वेता महाले यांच्या वतीने चिखली येथे ही 50 सर्वसाधारण व 20 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर या अगोदरच सुरु करण्यात आले आहे .

चिखलीतही सुरू आहे आधार कोविड सेंटर

मार्च, एप्रिलमध्ये कोरोनाची रूग्णसंख्या कमी झालेली असली तरी ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, ग्रामीण भागातील रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार घेणे शक्य होत नाही. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बेडसाठी वणवण फिरावे लागू नये, याकरिता कोरोना रुग्ण व नातेवाईक यांना काही प्रमाणात का होईना आमदार श्वेता महाले यांच्या वतीने आधार देण्यासाठी धाड येथे 50 बेडचे आधार कोविड रुग्णालय सुरू करुन त्यात मोफत उपचार देणार असल्याने रुग्ण व नातेवाईक यांना फार मोठा आधार मिळणार आहे. धाड परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार श्वेता महाले पाटील यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे प्रक्षेपण ऑनलाईन होणार

सदर उद्घाटनाचा कार्यक्रम कोरोनाच्या शासकीय नियम पाळून होणार आहे. या कार्यक्रमासाठी केवळ परवानगी मिळालेल्या व्यक्तीशिवाय कुणालाही प्रवेश असणार नाही. सदर कार्यक्रम हा लाईव्ह आपल्याला खालील लिंक वर पाहता येणार आहे.https://www.facebook.com/mipravindarekar/@raosahebpatildanve/@shweta.mahale.patil त्यामुळे या कार्यक्रमासाठी गर्दी न करता फेसबुक लाईव्ह वरुन कार्यक्रम पहावा असे आवाहनही आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी केले आहे.

हेही वाचा- 'प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या गावात 30 बेडचे रुग्णालय सुरू करा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.