ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यातील 'त्या' अपघाता प्रकरणी कंत्राटदारासह चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - Sindkhed Raja taluka

सिंदखेड राजा तालुक्यातील तडेगाव येथे समृद्धी महामार्गावर टिप्परच्या अपघातात 13 मजूरांचा मृत्यू झाला. त्या चालकाला अटक केली आहे. तर मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या टिप्पर चालक व कामगार कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार युवराज रबडे यांनी दिली आहे. दरम्यान, यातील आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (विवेक बगीश रॉय वय 27 वर्ष,) रा. धनेश चपरा बिहार असे टिप्पर चालकाचे नाव आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील 'त्या' अपघाता प्रकरणी
बुलडाणा जिल्ह्यातील 'त्या' अपघाता प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल
author img

By

Published : Sep 2, 2021, 6:03 PM IST

बुलडाणा - सिंदखेड राजा तालुक्यातील तडेगाव येथे समृद्धी महामार्गावर टिप्परच्या अपघातात 13 मजूरांचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी किनगांवराजा पोलिसांनी टिपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्याला अटक केली. तर मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या टिप्पर चालक व कामगार कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार युवराज रबडे यांनी दिली आहे. दरम्यान, यातील आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (विवेक बगीश रॉय, वय 27 वर्ष,) रा. धनेश चपरा बिहार असे टिप्पर चालकाचे नाव आहे. ज्ञानेद्र लक्ष्मी नारायण गोर पटेल रा. देवरीगंज मध्यप्रदेश असे कामगार कंत्राटदाराचे नाव आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

'टिप्परचा आणि चालकाचा परवाना निलंबित'

समृद्धी महामार्गाचे काम हे जवळपास 70 टक्के पूर्णत्वास गेले असून, सिंदखेड राजा तालुक्यातील पॅकेज क्रमांक सात मधील बांधकाम सहाय्यक कंत्राटदार रोडवेज सोल्यूशन इंडिया कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. त्या कामावर मध्य प्रदेशातील मजूर कार्यरत होते. सिंदखेड राजा तालुक्यातील तडेगाव येथे 20 ऑगस्ट रोजी हे मजूर पावसामुळे काम बंद पडल्याने टिप्परमध्ये अवैधरित्या बसून आणले गेले. एका वाहनाला साईट देताना टिप्पर पलटी होऊन यामधील लोखंडी सळईखाली दबून यातील 13 मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये टिप्पर चालक विवेक बगीश रॉय यांचा आणि मालवाहू टिप्परचा 6 महिन्यांसाठी परवानाही निलंबित करण्यात आला आहे.

'चौकशीमध्ये आरोपी वाढण्याची शक्यता'

समाजमन हेलाऊन टाकणाऱ्या या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, या मजुरांना अनिवार्य असलेल्या सर्व मूलभूत सोयीसुविधा मिळतात का? याचीदेखील चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. सोबतच अशी दुर्दैवी घटना पुन्हा होऊ नये यासाठी आणि झालेल्या या घटनेला संबंधित प्रोजेक्ट मॅनेजर जबाबदार असून, त्यांच्यावर देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पोलीस विभागासह कार्यकारी अभियंता समृद्धी महामार्ग यांच्याकडे करण्यात येत आहे. त्यामुळे आता या संपूर्ण गंभीर प्रकरणाची प्रशासनाकडून कसून चौकशी केली जात असून, यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा - समृद्धी महामार्गच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या टिप्परचा अपघात; 13 मजूरांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.