ETV Bharat / state

मी काँग्रेस सोडणार नाही, आमदार बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आज मुंबईत काँग्रेसचे ५ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे हेही भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, मी काँग्रेस सोडणार नसल्याचे बोंद्रेंनी स्पष्ट केले आहे.

आमदार राहुल बोन्द्रे
author img

By

Published : Sep 30, 2019, 12:12 PM IST

Updated : Sep 30, 2019, 12:41 PM IST

बुलडाणा - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आज मुंबईत काँग्रेसचे ५ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे हेही भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, मी काँग्रेस सोडणार नसल्याचे बोंद्रेंनी स्पष्ट केलंय. त्यामुळे बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

जेव्हा एकाच वेळी सगळीकडे एकच बातमी येते, तेव्हा ती बातमी नियोजितपणे पेरलेली असते. सातत्याने मी भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा बातम्या मागील 3 महिन्यांपासून सातत्याने दाखवण्यात येत आहे. याचे मी खंडणही करत आलो आहे. आज पुन्हा एकदा मी या बातमीचं स्पष्टपणे खंडन करतो. मी काँग्रेस सोडणार नाही. भाजप प्रवेशास माझा विनम्रपणे नकार असल्याचे बोंंद्रे म्हणाले.

मी काँग्रेस सोडणार नाही - आमदार राहुल बोंद्रे

काँग्रेस जो उमेदवार देईल त्याचे काम करणार
चिखली विधानसभा मतदारसंघात आणि बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष ज्या कुणाला उमेदवारी देईल त्यांचं काम मी संपूर्ण शक्तिनिशी करेल, असेही बोन्द्रे म्हणाले. आपण चिखलीत आहात आणि प्रवेश मुंबईत आहेत तर आपला भाजप प्रवेश ऑनलाईन तर नाही ना? ईटीव्ही भारताच्या प्रतिनिधीने असा प्रश्न विचारल्यावर बोन्द्रे म्हणाले, की मी इथे आहे प्रवेश मुंबईत आहेत. कदाचित हा ऑनलाईन प्रवेश असू शकतो असेही बोन्द्रे म्हणाले. बोंद्रे हे मागील २ महिन्यांपासून पक्ष प्रवाहात नाहीत. शिवाय विद्यमान आमदार असतानाही बोन्द्रे उमेदवारीबाबत जास्त इच्छुक नाहीत. त्यामुळे कुठं तरी पाणी मुरतंय एवठे मात्र नक्की.

Intro:Body:बुलडाणा : विधानसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये आज सोमवारी मुंबईत काँग्रेसचे ५ आमदार मेगाभरतीत सामील होणार आहे. यात बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांच्याही नावाचा समावेश असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, स्वतः आमदार राहुल बोंद्रे यांनीच या वृत्ताला आता फेटाळले आहे. मी काँग्रेस सोडणार नाही. भाजप प्रवेशास माझा विनम्रपणे नकार आहे, अशी भूमिका बोंद्रे यांनी स्पष्ट केली.तर आपण चिखलीत आहे आणि प्रवेश मुंबईत आहे तर आपला प्रवेश ऑनलाईन तर नाही ना असा इटीव्ही भारताच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर हो मी तर इथे आहे आणि पक्ष प्रवेश मुंबईत आहे तर कदाचित हा ऑनलाईन प्रवेश असू शकतो असे उत्तर आमदार राहुल बोंद्रे यांनी दिले

आमदार राहुल बोंद्रे म्हणाले, “जेव्हा एकाच वेळी सगळीकडे एकच बातमी येते, तेव्हा ती बातमी नियोजितपणे पेरलेली असते, हे सांगण्याची आवश्यकता नाही. आज (29 सप्टेंबर) दिवसभर मी भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अशा बातम्या मागील 3 महिन्यांपासून सातत्याने दाखवण्यात येत आहे. मी त्याचं सातत्यानं खंडणही करत आलो आहे. आज पुन्हा एकदा मी या बातमीचं स्पष्टपणे खंडन करतो. मी काँग्रेस सोडणार नाही. भाजप प्रवेशास माझा विनम्रपणे नकार आहे.” चिखली विधानसभा मतदारसंघात आणि बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष ज्या कुणाला उमेदवारी देईल त्यांचं काम मी संपूर्ण शक्तिनिशी करेल, असंही बोंद्रे यांनी नमूद केलं आहे.तर आपण चिखलीत आहे आणि प्रवेश मुंबईत आहे तर आपला प्रवेश ऑनलाईन तर नाही ना असा इटीव्ही भारताच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर हो मी तर इथे आहे आणि पक्ष प्रवेश मुंबईत आहे तर कदाचित हा ऑनलाईन प्रवेश असू शकतो असे उत्तर आमदार राहुल बोंद्रे यांनी दिले.असे असले तरी बोन्द्रे हे मागील २ महिन्यांपासून पक्ष प्रवाहात नाही शिवाय विद्यमान आमदार असतांना हि उम्मेदवारी बाबतही ते जास्त इच्छुक नाही यामुळे कुठं तरी पाणी मुरतंय एव्हडे मात्र नक्की....

बाईट:- राहुल बोन्द्रे,आमदार काँग्रेस

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Sep 30, 2019, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.