ETV Bharat / state

मेहकर न्यायालयाने दिला 20 दिवसामध्येच ऐतिहासिक वेगवान निकाल, आरोपीला दंडाची शिक्षा

author img

By

Published : Jun 28, 2021, 1:41 PM IST

मेहकरचे प्रथम न्याय दंडाधिकारी एस.ए.सुरजूसे यांच्या न्यायालयातही सुनावणी पार पडली. 20 दिवसातच निकाल दिल्याने न्यायालयीन इतिहासात हा देशाचा आणि राज्याचा पहिला वेगवान निकाल असल्याचा बोलले जात आहे. राजेश अर्जुन जाधव असे दंडात्मक कारवाईचे आदेश सुनावण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.

ऐतिहासिक वेगवान निकाल,
ऐतिहासिक वेगवान निकाल,

बुलडाणा - देशातील किंवा राज्यातील कोणत्याही न्यायालयात कोणतीही याचिका दाखल केल्यानंतर त्या याचिकेचा निकाल लागण्यासाठी शक्यतो वर्षानुवर्षे लोटल्याचे पाहायला मिळते. तसेच शिवाय जलद गतीच्या न्यायालयात देखील निर्णय लागण्यासाठी काही कालावधी लागतो. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर न्यायालयाने एका दाखल याचिकेचा निवाडा चक्क 20 दिवसातच लावत ऐतिहासिक निर्णय दिला.

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार एका पीडित महिलेची याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने आरोपी पतीला त्याच्या 8 वर्षीय मुलीच्या शिक्षण व ऑनलाईन शिक्षणासाठी 1 लाख रुपये, आणि घर भाड्यासाठी 5 हजार, तसेच पोटगी स्वरुपात पत्नीला 5 हजार रुपयाची दंडाची शिक्षा, असा हा ऐतिहासिक निर्णय दिला. मेहकरचे प्रथम न्याय दंडाधिकारी एस.ए.सुरजूसे यांच्या न्यायालयातही सुनावणी पार पडली. 20 दिवसातच निकाल दिल्याने न्यायालयीन इतिहासात हा देशाचा आणि राज्याचा पहिला वेगवान निकाल असल्याचा बोलले जात आहे. राजेश अर्जुन जाधव असे दंडात्मक कारवाईचे आदेश सुनावण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तो सार्वजनिक बांधकाम बुलडाणा उपविभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर सेवेत रुजू आहे.

ऐतिहासिक वेगवान निकाल,
असा आहे प्रकार-सार्वजनिक बांधकाम बुलडाणा उपविभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राजेश अर्जुन जाधव यांनी आपल्या पत्नीला माहेरून प्लॉट घेण्यासाठी व घरबांधकामसाठी पैसे आणण्याकरिता वेळोवेळी त्रास दिला. मागणी केलेले पैसे देवूनही राजेश हा दारूच्या नशेत आपल्या पत्नीला अत्यंत त्रास देत होता. तसेच कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा ८ महिन्यापूर्वी त्याने आपल्या पत्नी ८ वर्षाच्या मुलीला घराबाहेर काढत माहेरी पाठवून दिले. तसेच तिला नांदवण्यासही नकार दिला.

या प्रकरणानंतर राजेश यांच्या पत्नीने राजेश व त्यांच्या सासरवाडीतील नातेवाईकांविरोधात मेहकर प्रथम न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात 2005 च्या कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याने पोटगी साठी 2 जून 2021 रोजी याचिका दाखल केली होती. प्रथम न्याय दंडाधिकारी एस.ए.सुरजूसे यांनी 2 जून पासून 8 वेळा याचिकेची सुनावणी घेतली. त्यानंतर 23 जूनला या याचिकेचा निवडा करीत आरोपी राजेश अर्जुन जाधवला दंडात्मक कारवाई सुनावली. तसेच 8 वर्षीय मुलीच्या शिक्षण व ऑनलाईन शिक्षणासाठी 1 लाख रुपये, घर भाड्यासाठी 5 हजार व अंतरिम पोटगी स्वरूपात पत्नीला 5 हजार रुपयाची दंडाची शिक्षा देण्याचा ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे. दंडाची रक्कम 15 दिवसाच्या आत मध्ये जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. 20 दिवसातच दिलेल्या निकालाचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे. अर्जदार महिलाकडून महिला आणि बालकल्याणासाठी सदैव तत्पर आणि मोफत कार्य करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध अॅड अजयकुमार शंकरराव वाघमारे यांनी याचिकेत आपली बाजू मांडली.

असा होता आरोपी पतीचा विकृतपणा-

राजेश अर्जुन जाधव हे नेहमी दररोज रात्री दारू पिऊन जोराजोरात नाचायचे आणि पत्नीला टाळ्या वाजवायला लावायचे आणि त्याच्या डान्सची तारीफ करायला लावायचे. तसेच मला टाळ्या वाजवायला आणि डान्सची तारीफ करण्यास नकार दिल्यास, राजेश अर्जुन जाधव हे पत्नीला मारहाण करायचे आणि तिचे जोरात केस ओडायचे आणि कधी कधी तर पट्ट्यानेसुद्धा मारायचे, या सर्व अमानवीय आणि विकृत कृतीला राजेशला त्यांच्या आईचेसुद्धा समर्थन होते. या विकृत आणि अमानवी घटना घडत असतांना पीडित पत्नी घराच्या बाहेर दरवाज्याला कुलूप लावून बसायच्या, अशा याचिकाकर्त्या महिलाने सदरील याचिकेमध्ये म्हटले आहे.

पत्नी वेडी असल्याचे न्यायालयात दाखल केले होते डॉक्टराचे दस्तावेज-

राजेश अर्जुन जाधव यांनी स्वतःच्या पत्नीला वेडी ठरवण्यासाठी बुलडाण्यातील डॉ. बाहेकर, मानसोपचार रोग तज्ञ यांचे दस्तावेज न्यायालयात दाखल केले होते. मात्र न्यायालयाने सदरील दस्तावेज प्रथमदर्शी कायद्याच्या कसोटीवर उतरणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

आरोपी वडिलाच्या मुलीचे आहे जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न-

न्यायालयाने याचिका कर्त्यांच्या 8 वर्षाच्या मुलीची बौद्धिक क्षमता पाहून आणि तिचे भविष्यात जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहून तिच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून न्यायालयाने भारतीय संविधानाचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे दाखले देत हा निकाल दिला. त्यात अर्जदाराच्या 8 वर्षाच्या मुलीला जिल्हाधिकारी बनण्यासाठी आणि जिल्हाधिकारी बनण्याचा पाया रचण्यासाठी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्यासाठी 1 लाख रुपये 15 दिवसाच्या आत जमा करण्याचे आदेश राजेश अर्जुन जाधव यांना दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.