बुलडाणा - विक एन्ड, नाताळच्या सुट्यासह नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण तीर्थक्षेत्राला जाणे पसंद करतात. शेगाव येथील संत गजानन महाराज समाधीचे ( Sant Gajanan Maharaj Temple ) दर्शन घेण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी बघायला मिळत आहे. तर नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो, ही प्रार्थना आणि नवीन वर्षाचा ( Heavy Rush In Sant Gajanan Maharaj Temple ) नवीन संकल्प घेऊन याठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात. मंदिराची वेळ सकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत असते.
भाविकाकडून कोरोना नियमांचे पालन मात्र, याठिकाणी आगामी कोरोना लाटेच्या शक्यतेने संत गजानन महाराज मंदिर ( Devotee Rush In Sant Gajanan Maharaj Temple ) प्रशासनाने अजून तरी कुठलेही निर्णय घेतले नसले तरी, दर्शनासाठी येणारे भाविक मात्र स्वतः खबरदारी घेतानाच चित्र आहे. अनेक भाविक हे मास्क वापरत असून कोरोना नियमांचे पालन करताना सुद्धा दिसत आहेत. कोरोना पुन्हा ( Heavy Rush In Sant Gajanan Maharaj Temple ) उंबरठ्यावर जरी असला या आठवड्यात लाखो भाविक शेगावात दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर प्रशासन आगामी काळात काही निर्णय घेत का.? याकडे लक्ष लागून आहे.
राज्यात देवस्थानात मास्कबंदी विशेष म्हणजे राज्यातील इतर मोठ्या मंदिर ( Sant Gajanan Maharaj Temple ) प्रशासनाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे शेगावातही मास्कबंदी करण्यात येणार का असा सवाल नागरिक विचारत आहेत.