बुलडाणा - खामगाव तालुक्यातील कारेगाव खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकडून शाळेसमोरील गटार आणि नाल्या साफ करवून घेतले जात असल्याचा गंभीर प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला होता. या प्रकारची गंभीर दाखल घेत शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमली असून अहवाल प्राप्त होताच संबंधीतांवर कारवाई करणार असल्याचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी गायकवाड यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - CAA Protest : दगडफेकीत परभणीचे तहसीलदार जखमी; ओठाला पडले ७ टाके
ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी सरकारकडून विविध शैक्षणिक सवलती देण्यात येतात. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कारेगाव बुद्रुक येथील शाळेत शिक्षकांकडून इयत्ता 1 ते 7 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनच शाळेसमोरील संपूर्ण गावातील घाण कचरा साचलेले गटार साफ करून घेतले आहे. हा प्रकार नागरिकांनी कॅमेरात कैद करून समाजमाध्यमाद्वारे व्हायरले केल्याने हे प्रकरण उघडकीस आले. प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमली असून अहवाल प्राप्त होताच संबंधीतांवर कारवाई करणार असल्याचा खुलासा पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी गायकवाड यांनी केले आहे.
हेही वाचा -ऑपरेशन डॉल्फिन नोज: हेरगिरी प्रकरणी नौदलाचे ७ कर्मचारी अटकेत, आंध्रप्रदेश पोलिसांची कामगिरी