बुलडाणा - बऱ्याच दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. अखेर आज मंत्रिमंडळाच्या विस्ताराची घोषणा झाली. मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
भाजपकडून नुकतीच मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्याची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये आ. कुटे यांचं नाव निश्चित झाल्याने बुलडाणा जिल्ह्यासह जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मंत्रिपदासाठी अनेकांना डोहाळे लागले होते. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांची वर्णी लागली आहे.

त्यांच्या नावाची घोषणा होताच त्यांच्या मतदारसंघातील शेगाव शहरातसह बुलडाणा जिल्ह्यात भाजप-सेना मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड फटाक्यांची आतषबाजी करीत मिठाई वाटप करून आंदोत्सव साजरा केला.