ETV Bharat / state

बुलडाणा : देऊळघाट येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा 4 बालकांवर हल्ला - बुलडाणा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न न्यूज

तालुक्यातील देऊळघाट येथे पिसाळलेल्या कुत्र्याने 4 बालकांवर जीवघेणा हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना सोमवारी 8 फेब्रुवारीला रात्री घडली. जखमी बालकांवर उपचार जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. पिसाळलेल्या कुत्र्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

देऊळघाट पिसाळलेल्या कुत्र्याचा बालकांवर हल्ला

author img

By

Published : Feb 9, 2021, 2:11 PM IST

बुलडाणा - तालुक्यातील देऊळघाट येथे पिसाळलेल्या कुत्र्याने 4 बालकांवर जीवघेणा हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना सोमवारी 8 फेब्रुवारीला रात्री घडली. जखमी बालकांवर उपचार जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. पिसाळलेल्या कुत्र्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा - शरद पवारांनी कुठे कुस्त्या खेळल्या? सदाभाऊ खोत यांचा प्रश्न

पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याचा तत्काळ बंदोबस्त करावा

बुलडाणा शहरापासून काही अंतरावर असलेल्या देऊळघाट येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी रात्री अचानक हैदोस घालायला सुरुवात केली. या कुत्र्याने गावातील मोहम्मद फैजान मोहम्मद जाकिर अन्सारी (वय 6), कासिम खान आसिफ खान (वय 4), मावीया खान मुंतजीर खान (वय 7) व गजानन स्वप्नील देशमुख (वय 10) या चौघांना हल्ला करून चावा घेत जखमी केले आहे. जखमी बालकांना उपचाराकरिता तातडीने बुलडाण्याच्या सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या कुत्र्याने घेतलेल्या चाव्यामुळे मुलांना व ग्रामस्थांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा - एडक्याच्या लढतीवरील जुगारावर कारवाई; २ लाखांचा मुद्देमाल जप्त

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.