बुलडाणा - दहीद गावात शुक्रवारी रात्री अचानक दुर्मिळ खवले जातीचे मांजर आढळल्याने गावातील नागरिकांची तोबा गर्दी उसळली. याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी खवल्या मांजरीला ज्ञानगंगा अभयारण्यात सोडून दिले.
बुलडाणा तालुक्यातील दहीद गावाजवळ लागूनच असलेल्या जंगलातून दुर्मिळ खवले मांजर गावात आले. या मांजरावर गावकऱ्यांचे लक्ष गेल्यावर गावातील नागरिकांकडून या दुर्मिळ मांजरीला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली. याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. दरम्यान वनरक्षक समाधान मांटे यांनी गावात जावून दुर्मिळ खवल्या मांजरीला पकडून ज्ञानगंगा अभयारण्यात सोडून दिले आहे.