ETV Bharat / state

म्हाताऱ्या बापाला फिरावे लागते, जेव्हा पोरं निकम्मी असतात; आघाडी सरकारवर माजी कृषिमंत्र्यांचे टीकास्त्र - कृषी विधेयकाविषयी जागृती अनिल बोंडे

कपटाने सत्तेवर आला आहात, तर सरकार चालवून दाखवा, जनतेची कामे करा, असा टोला त्यांनी आघाडी सरकारला लगावला. शरद पवारांच्या राज्य दौऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले कि, चांगल्या कामाचे कौतुक व्हायलाच हवे. मात्र, म्हाताऱ्या बापाला फिरावे लागते, जेव्हा पोरं निकम्मी असतात तेव्हा.

बुलडाणा
बुलडाणा
author img

By

Published : Oct 28, 2020, 8:41 PM IST

Updated : Oct 28, 2020, 9:45 PM IST

बुलडाणा - सरकार पाडायचे आहे, असे भाजपने कधीच म्हटलेले नाही. मात्र, कपटाने सत्तेवर आला आहात, तर सरकार चालवून दाखवा, जनतेची कामे करा, असे भारतीय जनता पक्षाच्या किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे म्हणाले. शरद पवारांच्या राज्य दौऱ्याबाबत विचारले असता, चांगल्या कामाचे कौतुक व्हायलाच हवे. मात्र, म्हाताऱ्या बापाला फिरावे लागते, जेव्हा पोरं निकम्मी असतात तेव्हा, असे म्हणत त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली.

शेगाव येथील विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले कि, जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनाम्याची गरज नसून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. कृषी विधेयकांचा विरोध करताना काँग्रेसने ट्रॅक्टर जाळल्याबद्दल संताप व्यक्त करताना, शेतकरी ज्याची पूजा करतात ती उपकरणे जाळणे हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही ट्रॅक्टरचे पूजन करण्याचे अभियान करीत आहोत.

एक वर्षाअगोदर काय बोलले होते ते आठवा

सरकार पाडायचे आहे, असे भाजपने कधीच म्हटलेले नाही. मात्र, कपटाने सत्तेवर आला आहात तर सरकार चालवून दाखवा, जनतेची कामे करा, जे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते ते पूर्ण करा, असे ते म्हणाले. केंद्राने पारित केल्या कृषी विधेयकाविषयी काँग्रेस शेतकऱ्यांमध्ये अप्रचार करीत आहे, असा आरोप करत कृषी विधेयकाविषयी जागृतीची मोहीम यशस्वी करण्यासाठी बोंडे हे सध्या बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेगावात पत्रकारांशी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधीत एक वर्षाअगोदर काय बोलले होते ते आठवा आणि शेतकऱ्यांना दिलेले आश्वासने पूर्ण करा, बाकीचे करणे आता चालणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

आघाडी सरकारवर माजी कृषिमंत्र्यांचे टीकास्त्र

Last Updated : Oct 28, 2020, 9:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.