ETV Bharat / state

बाधित चिमुकलीची कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुट्टी, तर तरुण आढळला कोरोनाबाधित - कोविड रुग्णालय बुलडाणा

पाच वर्षीय चिमुकलीला कोविड रुग्णालयातून आज सुट्टी देण्यात आली. ही चिमुकली कुटुंबासोबत मुंबईतून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आली होती. तर 6 दिवसाआधी धारावीतून संग्रामपूर तालुक्यात पोहोचलेला तरुण कोरोनाबाधित आढळला आहे.

Bld
चिमुकलीला प्रमाणपत्र देताना अधिकारी
author img

By

Published : May 24, 2020, 4:50 PM IST

बुलडाणा - कोरोनाची लक्षणे आढळून न आल्याने पाच वर्षीय चिमुकलीला कोविड रुग्णालयातून आज सुट्टी देण्यात आली. ही चिमुकली कुटुंबासोबत मुंबईतून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आली होती. तर संग्रामपूर तालुक्यातील आणखी एक तरुण कोरोनाबाधित आढळला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 37 रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 3 रूग्ण मृत आहेत, तर 26 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णासह 8 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

बाधित चिमुकलीची कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुट्टी, तर तरुण आढळला कोरोनाबाधित

कोरोनाबाधित आढळलेल्या तरुणाचे कुटूंब 6 दिवसाआधी धारावीतून संग्रामपूर तालुक्यात पोहोचले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबातील 5 सदस्यांना खोकल्याचा त्रास सुरू झाल्यानंतर या सर्वांना शेगाव येथे पाठवून त्यांचे स्वॅब तपासले होते. 4 जणांचे अहवाल आल्यावर त्यामध्ये 17 वर्षीय तरुण कोरोनाबाधित आढळला. तर या तरुणाच्या वडिलांचा अहवाल येणे बाकी आहे.

बुलडाणा जिल्ह्याला रेडझोन जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढल्याचे समोर येत आहे. 10 मे रोजी जिल्हा कोरोनामुक्त झाल्याने त्यानंतर रेडझोनमध्ये गेलेले किंवा रेड झोन जिल्ह्यातून आलेले व्यक्तीच कोरोनाबाधित म्हणून आढळून आलेल्याची संख्या आहे. मलकापूर तालुक्यातील गावात मुंबईवरून आलेल्या कुटुंबापैकी 5 वर्षीय चिमुकली कोरोनाबाधित आढळली होती. तिला उपचारासाठी बुलडाण्याच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान कोरोनाची लक्षणे न दिसल्याने दिशादर्शकानुसार आज तिला बुलडाण्याच्या कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्स, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन केले.

संग्रामपूर येथील टूनकीतील 6 दिवस अगोदर 5 जण मुंबईतील धारावीमधून आले आहेत. या सगळ्यांना खोकल्याचा त्रास असल्याने त्यांना शेगावच्या कोविड रुग्णालयात भरती करून त्यांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 4 जणांचे अहवाल शनिवारी रात्री आल्यानंतर 17 वर्षीय तरुण कोरोनाबाधित आढळला आहे. सध्या आढळलेल्या कोरोनाबाधित तरुणाच्या वडिलांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.