बुलढाणा: पत्रकार परिषदेत बोलताना तुपकर (farmer leader,Ravikant Tupkar) म्हणाले, वाईन विकण्याचे परवाने ज्यांनी दिले त्यांना विचारा सरकारचे नेमके काय चाललेय. मला वाटते वाईन आणि दारू हा वेळा विषय आहे. वाईन चा थेट संबंध शेतकर्यांशी (Wine has a direct relationship with farmers) येतो.
मी किराणा दुकानांमध्ये वाईन ठेवण्याचे समर्थन करणार नाही..परंतु शेतकरी टिकला पाहिजे. ही सुद्धा त्याच्या पाठीमागची आमची भूमिका आहे. आणि सरकारने मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.असे छोटे मोठे निर्णय घेऊन लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया तुपकर यांनी व्यक्त केली आहे.